नेलपॉलिशचे असेही फायदे

आता नेलपॉलिशचेही वेगवेगळे प्रकार आले आहेत. वेगवेगळे कलर्स आणि नेलपॉलिश लावण्याच्या वेगवेगळ्या स्टाईल्स, पण याशिवाय नेलपॉलिशचे आणखी वेगळे अनेक फायदे आहेत.

Sachin Salve
13 डिसेंबर : नेलपॉलिशने नखांचं सौंदर्य वाढतं. आता नेलपॉलिशचेही वेगवेगळे प्रकार आले आहेत. वेगवेगळे कलर्स आणि नेलपॉलिश लावण्याच्या वेगवेगळ्या स्टाईल्स, पण याशिवाय नेलपॉलिशचे आणखी वेगळे अनेक फायदे आहेत.- काम करताना कधी कधी खरचटलं आणि हातातून रक्त येत असल्यास खरचटलेल्या जागेवर नेलपॉलिश लावा. याने रक्त थांबण्यास मदत होते.- वातावरणातल्या अनेक संसर्गामुळे त्वेचेला खाज येते. त्यावर नेलपॉलिश लावल्यानं ही खाज थांबण्यास मदत होईल.

- कपड्यांवर कोणत्याही प्रकारचे डाग असल्यास त्यावर पारदर्शी नेलपॉलिश लावा आणि कपडे लगेच धुऊन घ्या. नेलपॉलिशने कपड्यांवरचे डाग निघून जातात.- जुन्या चपलांचा रंग गेला असेल तर त्यावर आवडत्या रंगाचं नेलपॉलिश लावून तिला पुन्हा वापरता येऊ शकतं.

Trending Now