JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / पावसाळ्यात का वाढतात आजार? धोका टाळण्यासाठी घ्या ‘ही’ खबरदारी, Video

पावसाळ्यात का वाढतात आजार? धोका टाळण्यासाठी घ्या ‘ही’ खबरदारी, Video

पावसाळा हा आजारांचा ऋतू समजला जातो. पावसाळ्यात हे आजार होऊ नये म्हणून काय खबरदारी घ्यावी, याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 4 जुलै :  पावसाळा सुरू झाला, की तापमानात सतत बदल होतात. हवेत एक प्रकारचा ओलावा आलेला असतो. आपली प्रतिकार शक्ती कमकुवत होते. पावसाळा हा आजारांचा ऋतू समजला जातो. पावसाळ्यात कोणते आजार होऊ शकतात? हे आजार होऊ नये म्हणून काय खबरदारी घ्यावी याची माहिती आपण पाहूया. पुण्यातील डॉ. अविनाश भोंडवे यांनी ही माहिती दिली आहे. कोणत्या आजारांचा धोका? श्वसनाचे आजार :  पावसाळ्यात सर्दी, खोकलासारखे श्वसनसंस्थेच्या आजारांचा धोका असतो. या दिवसांमध्ये सर्दी, खोकला, ताप या आजारांची लागण होते. पावसात भिजलं नाही किंवा भिजल्यानंतर अंग कोरडं केलं तर आपण या आजरापासून वाचू शकतो. त्याचबरोबर सर्दी, खोकला झाल्यानंतर तातडीनं गुळण्या केल्या किंवा गरम पदार्थ खाल्ले तर या प्रादुर्भाव कमी होऊ शकतो. हा त्रास तरीही कमी झाला नाही तर डॉक्टरांना दाखवावं, असं भोंडवे यांनी सांगितलं.

पाण्यातून पसरणारे आजार : पाणी साचल्यानंतर होणाऱ्या आजारांचाही पावसाळ्यात धोका असतो. काही ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचून डबकी बनतात. त्यामध्ये मलेरियाचे डास वाढतात. या डासांमुळे मलेरियाची साथ पसरते. डेंग्यू किंवा चिकनगुनियासारखे आजार स्वच्छ पाण्यातून होतात. बऱ्याचदा आपल्या घरामध्ये कुंड्या असतात किंवा अनेकांच्या घरामध्ये एअर कंडिशनर असतात,त्याच्यामध्ये पाणी असतं. रेफ्रिजरेटरच्या खाली पाणी असतं त्याचबरोबर रस्त्यावर किंवा अनेक ठिकाणी लोक टायर ठेवतात, टेरेसवर काही गोष्टी अशा साठवून ठेवलेल्या असतात. या सगळ्यांमध्ये पावसाचे पाणी साचतं. या स्वच्छ पाण्यामुळे डेंग्यू पसरतो. त्याचबरोबर चिकनगुनियाचे डास अंडी घालतात. हे आजार रोखण्यासाठी पाणी साचणार नाही, याची काळजी घेण्याचा सल्ला डॉ. भोंडवे यांनी दिला. अंगावर काढू नका, पावसाळ्यात फिट राहण्यासाठी हे करा, डॉक्टरांनीच दिला सल्ला ‘उघड्यावर पावसात समान ठेवले असेल तर ते पूर्ण काढून ठेवा. पावसाळ्यामध्ये माशा पसरतात. या माशा अन्नावरुन आणि वेगवेगळ्या प्रकारच्या उघड्या घाणीमुधून पसरतात. त्या अन्नामध्ये जाऊन टायफाईड होऊ शकतो. पाणी दुषित झाल्यानं तसंच माशांमुळे उलट्या, जुलाबसारखे आजार होतात, अशी माहिती डॉ. भोंडवे यांनी दिली. पावसाळा हा आजारांचा ऋतू समजला जातो. या ऋतूमध्ये योग्य काळजी घेतली, तर ही स्वच्छ आणि थंड झालेली हवा आरोग्याला उपयुक्त ठरू शकते, असं त्यांनी स्पष्ट केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या