या 5 गोष्टी गणपती बाप्पाला खूप आवडतात, पूजेच्या वेळी नक्की ठेवा

सध्या सगळीकडे धूम आहे ती गणपती बाप्पाच्या आगमनाची. अगदी ढोल-ताशाच्या गजरात मोठ्या थाटात आपण सगळेच गणेशोत्सवाच्या तयारीला लागलो आहोत. पण मंडळी जर बाप्पाला खूश करायचं असेल तर त्यांच्या आवडीच्या या 5 गोष्टी आपल्याला नक्कीच आणल्या पाहिजे. या 5 गोष्टी पूजेच्या ठिकाणी नक्की ठेवा. आपल्या लाडक्या गणेशाला लंबोदर असं म्हटलं जातं आणि बाप्पाला सगळ्यात जास्त मोदक आवडतात हे सगळ्यांनाच माहित आहे. त्यामुळे बाप्पाला खुश करण्यासाठी पूजेच्या वेळी बाप्पासमोर मोदक ठेवायला विसरू नका. मंडळी पूजा म्हटलं की सगळ्यात आधी येतात ती म्हणजे फुलं. पण फुलांपेक्षाही गणपती बाप्पाला दुर्वा सगळ्यात जास्त आवडतात. त्यामुळे पूजेच्या वेळी दुर्वा ठेवायला विसरू नका.

फुलांमध्ये गणेशाला जास्वंदाचं फुलं खूप आवडतं. त्यामुळे तुम्ही तुमच्या लाडक्या बाप्पाला जास्वंदाचं फुलं वाहू शकता. आता विषय आला फळांचा. तर आपण प्रत्येक पूजेच्या वेळी केळी ठेवतो. तशी ती केळी आपल्या बाप्पालाही आवडतात. पण लक्षात असू द्या की एकेक केळ्याचा नैवेद्य बाप्पाला देण्यापेक्षा केळ्याचा घड ठेवलेला कधीही योग्य. तुम्ही बाप्पाच्या मुर्तीकडे नीट पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की गणेशाच्या 4 हातांपैकी एका हातात शंख आहे. त्यामुळे गणेश पूजा करत्यावेळी शंख ठेवणंही महत्त्वाचं आहे. गणपती बाप्पाला शंख खूप आवडतो, म्हणूनच त्यांच्या पूजेवेळी आणि आरतीवेळी शंख वाजवला जातो.

Trending Now