आॅफिसला जाताना कसं दिसाल ताजंतवानं?

सकाळी आपली त्वचा ताजीतवानी कशी राहील, याची काळजी घ्यायची असेल तर छोट्या छोट्या ब्युटी टिप्स आहेत.

Sonali Deshpande
मुंबई, 25 जुलै : सकाळी आॅफिसला जायची घाई सगळ्यांनाच असते. पण उठल्यावर चेहऱ्याला मेकअप करायला वेळही नसतो. अशा वेळी सकाळी आपली त्वचा ताजीतवानी कशी राहील, याची काळजी घ्यायची असेल तर छोट्या छोट्या ब्युटी टिप्स आहेत.काही खास ब्युटी टिप्स- चेहऱ्याचं सौंदर्य जपायचं असेल तर आपल्या त्वचेला पुरेसं पोषण मिळणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी रात्रीच त्वचेला मॉश्चराईज करा.

- रात्री कापसाच्या बोळ्यावर गुलाबपाणी टाकून ते फ्रिजमध्ये ठेवा. आणि सकाळी चेहरा धुतल्यावर 5 मिनिटांनी चेहऱ्यावर लावा. यानंतर चेहऱ्याचा मेकअप केला तरी चालेल.- रात्री झोपताना पाच चमचे दुधात थोडंसं लिंबू पिळा. 20 मिनिटानंतर त्याला चेहऱ्याला लावा आणि झोपा. सकाळी चेहरा धुवा. यामुळे चेहऱ्याच्या कोमलतेबरोबरच चेहऱ्यावर तेज येतं.- रोजचं एक फिक्स मेकअप रुटीन ठेवा. मेकअपच्या सगळ्या पद्धती तुम्हाला माहित असतील तर हे लक्षात असू द्या. रोजच्या दिवसात हे खूप उपयोगी आहे, त्याने घाईच्या दिवशी तुमची गडबड होत नाही.- प्रवासाने आपले केस खूप खराब होतात पण सकाळच्या कामांमुळे केस धुवायला पुरेसा वेळ मिळत नाही. मग अशा वेळी रात्रीच केस धुऊन घ्या. यामुळे सकाळपर्यंत केस सुकतात आणि चांगले सेटही होतात.- सकाळी कामाची खूप गडबड आणि कधी कधी तर आयत्या वेळेला कामाचा ताण वाढतो त्यात आणखी उशीर होण्यापेक्षा आपल्या मेकअपला साजेसा असा ड्रेस रात्रीच काढून ठेवा. त्याने सकाळी धावपळ होणार नाही.- या सगळ्यात महत्त्वाचा आहे तो तुमचा आहार. तुम्ही दिवसभर पौष्टिक जेवण करा. याने आपोआपच त्वचा उजळते.

Trending Now