लग्नानंतरही वाढू शकतं तूमचं इनकम, या आहेत 6 टिप्स

लग्नाच्या आधी प्रत्येकालाच असं वाटत असतं की लग्न केल्यानंतर संपूर्ण आयुष्य बदलतं. अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. लग्नाआधी आपण एकटेच असतो. मात्र लग्नानंतर जबाबदारी वाढते. ही जबाबदारी योग्य पद्धतीने सांभाळली गेली नाही तर संसाराची गाडी मध्येच बंद पडू शकते. तुम्हाला माहिती आहे का, की लग्नानंतर तुमच्या समस्या वाढण्यापेक्षा कमी होऊ शकतात. त्याचबरोबर तुमची मिळकतदेखील वाढू शकते. आज आम्ही तुम्हाला यासाठीचे असे सहा उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे लग्नानंतर तुमची मिळकत वाढेल.


बचत आणि गुंतवणूक– लग्नाआधी तुम्ही आपल्या मर्जीचे राजे असता. मात्र लग्नानंतर तुमच्यावर पार्टनरचीही जबाबदारी असते. त्यामुळे तुम्हाला बचत आणि गुंतवणूकीकडे फार लक्ष द्यावे लागेल. पती-पत्नी दोघांनी मिळून बचत केली पाहिजे आणि योग्या ठिकाणी आणि योग्या वेळी गुंतवणूक केली पाहिजे. ध्येय आणि आर्थिक क्षमतेवर चर्चा- बचत आणि गुंतवणूक असे व्यावहारीक निर्णय दोघांनी मिळून घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर तुमची कमाई, गुंतवणूक याबद्दल मोकळेपणाने एकमेकांशी बोलणे गरजेचे आहे. असे केल्याने तुम्हाला कळू शकते की तुम्ही आत्तापर्यंत किती बचत केली आहे. तसेच भविष्याचे टार्गेट निश्चित करायला याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. एकाच अकाऊंटचा वापर – लग्नानंतर जर तुम्ही दोघेही कमवते असाल तर खर्चासाठी फक्त एकाच्याच अकाऊंटमधून पैसे खर्च करणे योग्य नाही. जर दोघे कमवत असाल तर खर्च दोघांमध्ये वाटून घ्यावा. यामुळे तुम्हाला होमलोन, ईएमआयमध्ये सूट मिळू शकते. पार्टनरचे आर्थिक व्यवहार माहित असणे आवश्यक- लग्नानंतर जर दोघं मिळून कर्जासाठी अर्ज करणार असाल तर आपल्या पार्टनरची मिळकत आणि त्याचे आर्थिक व्यवहार माहित असणं गरजेचं आहे. यामुळे तुमच्या कर्जाच्या व्याजावर फरक पडू शकतो. इमर्जन्सी फंड तयार करा- लग्नानंतर लगेच पती- पत्नीने एक इमर्जन्सी फंड बनवावा. त्या फंडाला तुम्ही पहिले प्राधान्य दिले पाहिजे कारण यामुळे तुमच्या अनेक समस्या कमी होऊ शकतात. एकमेकांवर विश्वास ठेवा- पती-पत्नी दोघांचाही एकमेकांवर विश्वास असावा. यामुळे तुम्हाला एकमेकांची मदत तर मिळेलच शिवाय तुमची उत्तोरोत्त प्रगती होईल.

Trending Now