एफडीत पैसे गुंतवताय? मग हे वाचाच!

अनेक जण एफडी म्हणजेच फिक्स डिपाॅझिटमध्ये गुंतवणं पसंत करतात. पण त्यासाठी काही काळजी घ्यावी लागते.

Sonali Deshpande
मुंबई, १८ जून : प्रत्येक जण आपली कमाई कशी गुंतवायची याचा विचार करत असतं. एक तर आपले पैसे सुरक्षित राहावेत आणि ते वाढावेत असं प्रत्येकालाच वाटत असतं. त्यासाठीच अनेक जण एफडी म्हणजेच फिक्स डिपाॅझिटमध्ये गुंतवणं पसंत करतात. पण त्यासाठी काही काळजी घ्यावी लागते.१. एफडीच्या व्याजाचा दर किती आहे ते तपासणं महत्त्वाचं असतं. प्रत्येक बँकेत थोडा फार फरक असतो. पण ज्येष्ठ नागरिकांसाठी तो जास्त असतो. ७ दिवस ते १० वर्षांपर्यंत तुम्ही पैसे गुंतवू शकता. १ कोटीच्या एफडी घेतल्या तर बँका जास्त व्याज देतात.२. अनेक स्कीम्स असतात. जास्त चांगला परतावा कुठे मिळतोय पाहावा. बेस्ट टर्म डिपाॅझिट कुठे आहे ते बघावे. अचानक एफडी मोडाव्याही लागू शकतात.

हेही वाचाफक्त 20 रूपयांसाठी रिक्षाचालकाने घेतला प्रवाशाचा जीव

माहेरून पत्नी येत नसल्यानं जावयानं कापलं सास-याचं नाक

३. एकाच बँकेत पैसे गुंतवू नये. दोन-चार बँकांमध्ये एफडी ठेवावेत.४. एफडीवर मिळणारं व्याज वेगवेगळ्या प्रकारचं असतं. दर महिन्याला, तिमाही आणि वार्षिक. तुमच्या गरजेप्रमाणे तशी सूचना बँकेला द्यावी.५. काही बँकांमध्ये एफडी मध्येच काढली तर पेनल्टीचे पैसे द्यावे लागतात. एफडीत पैसे गुंतवण्याआधी ते तपासून पाहावं.

Trending Now