पेटीएम युजर्सनी या चूका कधीच करू नये, होऊ शकतं लाखोंचं नुकसान

सध्या ऑनलाईनचा जमाना असल्याने अनेकजण ऑनलाईन शॉपिंग, नेट बँकीगचा पेटीएमद्वारे वापर करतात. पण बऱ्याच वेळा छोट्या छोट्या चुकांमुळे हजारोंचं नुकसान करून घेतात. आज आम्ही तुम्हाला अशा टिप्स देणार आहोत ज्यामुळे तुमच्या पेटीएम व्हॉलेटमधून पैशांचे नुकसान होणार नाही. फसवणूकीच्या लिंकपासून सावधान – अनेकवेळा असं होतं की आपल्या फोनमध्ये फोर्वडेड मेसेज अथवा लिंक येतात. काही लोक त्यांला दुर्लक्षित करतात, पण काही लोक तो मेसेज उघडून पाहतात. खर तर हे मेसेज फसवणूकीच्या हेतुने केले जातात. पेटीएम अशा कुठल्याही प्रकारची माहिती देत नाही. ओटीपी शेअर करु नका – काही लोक तुम्हाला फोन करून खोटं कारण सांगून तुमचा ओटीपी नंबर मागतात. तर अशा लोकांना कधीच तुमचा ओटीपी नंबर सांगू नका. ओटीपी नंबर घेऊन ते लोक तुम्हाच्या पेटीएम अकाउंटवरील पैसे लंपास करू शकतात.

केवायसी करण्यासाठी फसवणूकीचा फोन –काही लोक तुम्हाला फोन करून तुमच्या पेटीएम अकाउंटवरील केवायसी पुर्ण करण्यास सांगतात. तसं केल्याने तुमचा संपूर्ण डेटा तुम्ही त्या व्यक्तिला देता, आणि मग तो तुमच्या अकाउंटवरील कुठलीही माहिती मिळवू शकतो. फसवणूकी झाली तर आधी या गोष्टी करा–तुमच्या अकाउंटवरील पैशांची हेराफेरी करण्यात आली तर तुम्ही पेटीएम पेजवरील उजव्या कोपऱ्यात प्रोफाइल आयकॉनवर क्लिक करा आणि 24x7 हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक केल्यावर 'प्राइवेसी एंड सिक्योरिटी' हा पर्याय उघडेल. त्यानंतर तुमची कशा प्रकारे फसवणूक करण्यात आली ते डिटेल्स भरा. याचा फायदा म्हणजे तक्रार नोंदविल्यानंतर पेटीएमद्वाके फसवणुक केलेल्या व्यक्तीवर लगेचच कारवाई केली जाते. यामुळे तुमचे पैसे परत मिळण्याची शक्यता असते.

Trending Now