मुलगी वयात आल्यावर या राज्यांमध्ये साजरा होतो सोहळा

महिलांना मासिक पाळी येणं हे नैर्सगिक आहे, पण तरीही त्याबद्दल समाजात असंख्य समज-गैरसमज आहे. मुलगी वयात आली,की प्रत्येक राज्य वेगवेगळ्या प्रथा पाळतं.

Sonali Deshpande
21 नोव्हेंबर : मासिक पाळी हा महिलेच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. मासिक पाळीच्या दरम्यान महिलेच्या शरीरात अनेक बदल होत असतात. पहिल्यांदा पाळी आली की आपली मुलगी वयात आली असं म्हणतात. महिलांना मासिक पाळी येणं हे नैर्सगिक आहे, पण तरीही त्याबद्दल समाजात असंख्य समज-गैरसमज आहे. मुलगी वयात आली,की प्रत्येक राज्य वेगवेगळ्या प्रथा पाळतं.जेव्हा सॅनेटरी पॅडसारख्या सुविधा उपलब्ध नव्हत्या तेव्हा महिलांना पाळीच्या दरम्यान अनेक समस्यांना तोंड द्याव लागायचं. त्यामुळे त्यांच्या त्या काळात त्यांना थोडा आराम देण्यासाठी काही राज्यांनी वेगवेगळ्या परंपरा सुरू केल्या. त्याने त्या महिलेचा त्रास तर कमी झालाच पण मुळात मी काही चूक नाही केली किंवा मला पाळी येते म्हणजे मी काही गुन्हा केला असा समज नष्ट होण्यास मदत झाली.कर्नाटक

तामिळनाडूतामिळनाडूमध्येही 'पहिली मासिक पाळी' ही एका सणासारखी साजरी केली जाते. त्यांच्यात अगदी थाटमाटात हे साजरं केलं जातं. 'मंजल निरट्टू विज्हा' (Manjal Neerattu Vizha) असं त्यांच्या परंपरेचं नाव आहे. ही परंपरा अगदी लग्नसमारंभासारखी असते. यात मुलीला हळद लावून अांघोळ घालतात. तिला सिल्कची साडी नेसवतात. तिला दागिन्यांनी मढवतात. तिची पूजा करतात. तिच्यासाठी रांगोळी आणि गाण्यांची मैफिल असते. इतकचं नाही तर तिला शुभेच्छांसोबत खूप सारे गिफ्टस्ही दिले जातात.

आसामआसाममध्ये 'पहिली मासिक पाळी' आली की 'तुलोनी बिया' (Tuloni Biya) या नावाची परंपरा आहे. यादरम्यान त्या मुलीला एका वेगळ्या खोलीत ठेवलं जातं. त्या खोलीत पुरुषांना जाण्याची परवाणगी नसते. पुरुष चार दिवस त्या खोलीत जाऊ शकत नाहीत, त्या मुलीचा चेहराही ते पाहू शकत नाहीत. सुपाऱ्यांच्या दोन जोड्या लाल फडक्यात बांधून ते आजूबाजूच्यांना दिले जाते. सात विवाहित महिला त्या मुलीला अंघोळ घालतात. मग ती त्या सुपाऱ्यांची पुजा करते. यात त्या मुलीला अगदी नवरीसारखं सजवलं जातं.केरळकेरळमध्ये 'पहिली मासिक पाळी' आली की तीन दिवसांपर्यंत ती मुलगी सगळ्यांपेक्षा वेगळी राहते. तिला एका खोलीत ठेवलं जातं. त्या खोलीत एक दिवा लावला जातो. त्या दिव्याजवळ पितळेच्या भांड्यात नारळाची फुलं ठेवली जातात. असं समजलं जातं की जितक्या त्या फुलाच्या कळ्या फुलतील तितकीच मुलं त्या मुलीला होतील.

Trending Now