रोज खा खजूर, व्यायामाशिवाय कमी करा वजन !

Renuka Dhaybar
मुंबई, 28 जून : आपल्या लाईफस्टाईलमध्ये आरोग्यादायी बदल करणे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लठ्ठपणा. लठ्ठपणा घालवण्यासाठी आपण अनेक गोष्टी करत असतो. पण इतर सगळं करण्यापेक्षा लठ्ठपणावर सगळ्यात फायदेशीर आहे ते म्हणजे सुका खजूर.
जाणून घेऊयात सुका खजूरचे काही फायदे रोज सकाळी नाश्ता करत्यावेळी 2 खजूर खा. त्याने वजम कमी होण्यासाठी मदत होते. त्याने शरीराला डिटॉक्सीफाय करण्यासाठी मदत होते. शरीरातल्या पाण्याच्या कमतरतेला वाढवण्यासाठी खजूर हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. उपवासावेळी किंवा आजारी असताना खजूर खाल्ल्याने शरीराला उर्जा मिळते. नियमितपणे खजूर खाल्ल्याने त्वचा आणि केसांना पोषण मिळते.

तरुण आणि गर्भवती महिलांनी तर रोज खजूर खाल्लं पाहिजे. केसांसाठी तर खजूर अतिशय महत्त्वपूर्ण आहे. रोज 2 ओले खजूर खाल्ल्याने केस गळणे कमी होते.

Trending Now