थांबा, मोबाईल हातात येण्याआधी आपण कोणते खेळ खेळलात ?

मुंबई, 11 जुलै : सध्या आपण व्यस्त असतो ते फक्त आणि फक्त फोनमध्ये. पण मंडळी जरा विचार करा की जेव्हा मोबाईल नव्हते तेव्हा आपण आपला टाईमपास कसा करायचो. जरा आठवून बघा लहानपणी आपण किती मजेदार खेळ खेळायचो . ज्यामध्ये फुटबॉल, बास्केटबॉल आणि क्रिकेटसारखे खेळ आपण मोबाईल आणि टीव्हीवर नाही तर प्लेग्राउंडवर खेळायचो. आपण लहानपणी खेळलेले हे खालील खेळ बघा तुम्हाला आठवतात का ? फुल्ली-गोळा (Tic-Tac-Toe) - खरंतर शाळेच्या वह्या या अभ्यासाने कमी आणि फुल्ली-गोळ्याच्या खेळानेच भरलेल्या असायच्या. हा खेळ तर प्रत्येकाचा टाईमपास होता. लगोरी - हा खेळ तर मुलींनमध्ये खूप प्रसिद्ध होता. पण काही मुलंदेखील हा खेळ खेळायचे. यामध्ये एका टीमने काठीने एकावर एक जमवलेल्या दगडांना मारायचे आणि दुसऱ्या टीमने ते दगड एकत्र करून एकावर ठेवायचे. हो आता यात जो जिंकेल त्याची शान काही औरच...

लपाछुपी - लहानपणी सगळ्यांनीच लपाछुपी हा खेळ खेळला असणार. उन्हाळी सुट्टीत हा खेळ तर ठरलेलेच असायचा. एकाने राज्य घेतल्यावर त्याने बाकीचांना शोधेपर्यंत घरातून जेवणासाठी बोलावलं जायचा. आता तर तुम्ही नक्कीच तुमच्या बालपणाच्या आठवणीत रमला असाल. फ्लेम्स - हा गेम तर सगळ्या मुलांनी ९वी , १०वीत असताना नक्कीच खेळाला असणार. त्यावेळी फ्लेम्स हा लव्ह कॅल्क्युलेटर म्हणून ओळखला जात होता. या गेममुळे भरपूर मुलांचा हृदयाचा ठोका चुकला तर काहींसाठी हा गेम लव्हलाईफ ठरला. याचा फुलफॉर्म असा की, F - Friendship, L - Love, A - Affection, M - Marriage, E - Enemy, S - Sister (Sibling). पकड-पकडी - लहानपणी सर्वांत पहिला खेळ कुठला खेळला असेल तर तो पकड-पकडी. हा खेळ तर प्रत्येकाला खेळायला आवडायचा. पकडा-पकडी खेळताना तर टीव्ही बघण्याचं देखील भान राहत नसायचं. हो आता हा खेळ खेळण्यासाठी जागा राहिली नाही हा भाग वेगळा, पण आपलं बालपण हे याच खेळात गेलं. राजा-राणी, चोर-शिपाई - लहानपाणी सर्वांचंच आपलं एक वेगळं जग असत. त्या जगात ते स्वतःच राजा असतात आणि स्वतःच शिपाई. राजा-राणी, चोर-शिपाई हा खेळ खेळून त्या मुलांला खऱ्या आयुष्यात तर नाही पण खेळात तर नक्कीच राजा बनता येत असे. अशा प्रकारचे विविध खेळ आपण खेळलो जे या स्मार्ट जागापासून खूप वेगळे होते.

Trending Now