डियर गर्ल्स, या 5 गोष्टींवर सल्ले दिलेले मुलांना आवडत नाही

असं नेहमी म्हंटलं जात की महिलांना समजणं कठीण आहे. पण आता फक्त महिलांनाच नाही तर पुरुषांना देखील समजणं कठीण झालं आहे. आताच्या काळात नवरा- बायको का आणि कोणत्या कारणांवरून भांडण करतील याचा काही नेम नाही. स्त्री-पुरूष समानतेचा जमाना असल्यामुळे कोणी कोणाला काहीही बोललेल आवडत नाही. पण त्यातही मुलांचा राग काही औरच असतो, त्यामुळे काही बाबतीत त्यांना सल्ले न दिलेलेच बरे. अनेकदा पुरुषांना त्यांच्या सवयींबाबतीत बोललेलं आवडत नाही. त्यांना त्यांच्या चुका माहिती असतात, पण त्या तुम्ही दाखवल्या की मात्र त्यांचा पारा चढतो. त्यामुळे अशा वेळेस त्यांना त्यांच्या चुका दाखवण्यापेक्षा हळूहळू त्याची जाणीव करून द्या. नाहीतर यावर दुर्लक्ष करणं हा एकच पर्याय उरतो. पुरूषांना त्यांच्या मित्रांमध्ये महिलांनी ढवळाढवळ केलेली आवडत नाही. त्यामुळे जर विनाकारण वाद टाळायचे असतील तर त्यांच्या मित्रांबद्दल किंवा त्याच्या मित्रांसोबत असताना त्यांना सल्ले देऊ नका.

आपल्या चेहऱ्यावरून कोणी आपल्यावर कमेंट केलेलं पुरूषांना अजिबात आवडत नाही. चेहऱ्यापेक्षा मनाने बोललेलं त्यांना फार आवडतं काही वयोगटातील पुरुषांना असं वाटत असतं की इतरांवर टीका करण्याचा फक्त त्यांनाच अधिकार आहे. अशा लोकांशी समजुतदारीने वागणं गरजेचं आहे. वारंवार पुरूषांच्या सवयींमध्ये ढवळाढवळ केली तर त्यातून ते सुधारतील कमी पण त्यांचा स्वभाव रागीट जास्त होईल. त्यामुळे त्यांच्या चांगल्या किंवा वाईट सवयींवर त्यांना सारखं बोलणं टाळा. त्यांना थोडीफार मोकळीक देण्याचाही प्रयत्न करा.  

Trending Now