आता एका रुपयात खरेदी करा डाळ आणि तांदूळ

भारतात ऑनलाइन ग्रॉसरी खरेदी करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. ऑनलाइन ग्रॉसरीच्या या वाढत्या मागणीमुळे बिग बास्केट, अमेझॉन यासारख्या इ- क़ॉमर्स कंपन्या जोरदार चालत आहेत. आता यात अजून एका कंपनीचा सहभाग होणार आहे. ती म्हणजे देशातली सर्वात मोठी इ- क़ॉमर्स कंपनी मानली जाणारी फ्लिपकार्ट. फ्लिपकार्ट आता इतर वस्तुंसह ग्रॉसरीची डिलीव्हरी देखील करणार आहे. फ्लिपकार्टने आता त्यांचे ग्रॉसरी स्टोर 'सुपरमार्ट' लाँच केला आहे. या स्टोरमध्ये तुम्हाला मोबाईल, टीव्ही यांच्यासह ग्रॉसरीच्या खरेदीवर दमदार सुट मिळणार आहे.

जर तुम्ही फ्लिपकार्टमधून ग्रॉसरी खरेदी केली तर तुम्हाला 'todays steal deals'च्यामधून रोज तीन उत्पादने एक रुपयात मिळणार आहेत. फ्लिपकार्ट तुम्हाला एका रुपयात एक किलो डाळ, एक किलो तांदुळ आणि एक किलो घवाचे पिठ मिळणार आहे. सध्या या कंपनीची सर्विस हैदराबाद आणि बेंगलोरमध्ये सुरू आहे. फ्लिपकार्टचे हे ग्रॉसरी स्टोर लवकरच दिल्लीत सुरू करण्यात येणार आहे.

Trending Now