मराठी बातम्या / बातम्या / लाइफस्टाइल / तुम्हाला माहितीये? त्वचेप्रमाणे केसांसाठीही आवश्यक असते ऊन, पाहा काय होतात फायदे

तुम्हाला माहितीये? त्वचेप्रमाणे केसांसाठीही आवश्यक असते ऊन, पाहा काय होतात फायदे

ज्याप्रमाणे त्वचा आणि शरीरासाठी व्हिटॅमिन डी आवश्यक आहे. त्याचप्रमाणे केसांच्या वाढीसाठी व्हिटॅमिन डीदेखील आवश्यक आहे. जेव्हा शरीरात व्हिटॅमिन डी चांगल्या प्रकारे तयार होते, तेव्हा केसांची वाढदेखील जलद होते.

ज्याप्रमाणे त्वचा आणि शरीरासाठी व्हिटॅमिन डी आवश्यक आहे. त्याचप्रमाणे केसांच्या वाढीसाठी व्हिटॅमिन डीदेखील आवश्यक आहे. जेव्हा शरीरात व्हिटॅमिन डी चांगल्या प्रकारे तयार होते, तेव्हा केसांची वाढदेखील जलद होते.


मुंबई, 30 जानेवारी : केसांना उन्हापासून वाचवायला हवं असं आपण अनेकदा ऐकलं असेल. अतिनील किरणांमुळे केस खराब होतात आणि ते कोरडे आणि निर्जीव होऊ शकतात. आम्ही तुम्हाला सांगतो की त्वचेसोबतच केसांनाही सूर्यप्रकाशाचा फायदा होतो. स्टाइलक्रेझच्या मते, सूर्याची किरणे शरीराला व्हिटॅमिन डी तयार करण्यास मदत करतात.

उन्हामुळे त्वचेला फायदा होतो आणि केसांची वाढ होण्यास मदत होते. मात्र केसांना मर्यादित काळासाठीच ऊन देता येते. आज आम्ही तुम्हाला याचे फायदे सांगणार आहोत.

Hair Care Tips : केस रुक्ष आणि निस्तेज झालेत? या व्हिटॅमिन्सची कमतरता असू शकते कारण

केसगळतीवर फायदेशीर

केसगळतीची समस्या असणाऱ्यांसाठी ही एक आनंदाचीच बातमी आहे. असे आढळून आले आहे की, जर तुम्ही अधूनमधून केस मोकळे सोडले तर केस गळण्याची समस्या बर्‍याच प्रमाणात कमी होते. मात्र यासोबत हेदेखील लक्षात ठेवायला हवे की, केसांमध्ये एपिथेलियल पेशी असतात, ज्या केसांची वाढ वाढवण्याचे काम करतात.

या पेशी अतिनील किरणांना अत्यंत संवेदनशील असतात. तसेच केसांमध्ये व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन सी पातळी राखण्यासदेखील मदत करतात. अशा परिस्थितीत जास्त सूर्यप्रकाशामुळे केस गळण्याची समस्या वाढूदेखील शकते.

केसांच्या वाढीसाठी फायदेशीर

त्वचेसाठी आणि आपल्या शरीरासाठी ज्याप्रमाणे व्हिटॅमिन डी आवश्यक आहे, त्याचप्रमाणे केसांच्या वाढीसाठी व्हिटॅमिन डी आवश्यक आहे. त्याचा मुख्य स्त्रोत सूर्यकिरणे आहेत. जेव्हा शरीरात व्हिटॅमिन डी चांगल्या प्रकारे तयार होते. तेव्हा अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या स्वतःच दूर होऊ लागतात आणि त्यामुळे केसांची वाढही वेगाने होऊ शकते.

केसगळतीमुळे त्रस्त असाल तर या गोष्टी आहारात घ्या, परिणाम लगेच दिसून येईल

केसांचे नुकसान टाळण्यासाठी अशी घ्या काळजी

सूर्यकिरणांनी किंवा उन्हाने केसांना फायदा होतो. मात्र यासाठी तुम्ही कोवळ्या उन्हाचा वापर केला पाहिजे. जास्त कडक उन्हामध्ये केस मोकळे सोडल्यास तुमच्या केसांचे नुकसानही होऊ शकते. केस दीर्घकाळ सूर्यप्रकाशात राहिल्यास केस कोरडे होणे, कोमेजणे किंवा रंग फिकट होण्याची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे जेव्हा तुम्ही कडक उन्हात बाहेर जाल तेव्हा स्कार्फ किंवा टोपीने केस झाकून ठेवा. याशिवाय तुम्ही UV प्रोटेक्टर स्प्रे देखील वापरू शकता.

First published: January 30, 2023, 09:00 IST

Tags:Beauty tips, Health, Lifestyle, Woman hair

ताज्या बातम्या