मिठी मारण्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का?

आपल्या माणसाला गळाभेट करणं सर्वात सुंदर अनुभव असतो. मिठी मारून आपण समोरच्या व्यक्तीला ती खूप खास असल्याचे अप्रत्यक्षपणे सांगतो. आपल्या माणसाने मिठी मारली तर लगेच मूड चांगला होतो.

मिठी मारणं हे आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे संशोधनात सिद्ध झाले आहे. मिठी मारताना हृदयाचे ठोके हळू होतात. तसेच रक्तदाबही नियंत्रणात येतो मिठी मारल्यावर मनातील भावना समोरच्या व्यक्तीला कळतात. यामुळे ऑक्सीटोसिन हॉर्मोन रिलीज होतात. हा बॉन्डिंग हॉर्मोन आहे. हा हॉर्मोन आई आणि मुलामध्ये असलेल्या बॉन्डिंगला रिलीज होतो. मिठी मारल्यामुळे मानसिक आणि शारिरीक तणाव कमी होतो. चांगल्या आरोग्यासाठी मनमोकळेपणाने गळाभेटी करा.

Trending Now