पिकलेलं केळं खा आणि तंदुरुस्त रहा!

News18 Lokmat
केळं हे आरोग्याला चांगलं असतं. पण ज्या केळ्यांवर काळे डाग पडलेले असतात, त्याचा आरोग्यासाठी जास्त फायदा होतो. जास्त पिकलेली केळी खाल्ली की कॅन्सर होण्याची शक्यता कमी होते. माणसाची रोग प्रतिकारशक्ती वाढते. पिकलेल्या केळ्यात पोटॅशियम जास्त असतं. सोडियम कमी असतं.त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. शरीरात पाण्याची कमतरता राहत नाही. शरीराचं मेटॅबोलिजम चांगलं राहतं.

केळ्यानं अंगात शक्ती येते. हिमोग्लोबिन वाढतं. पिकलेल्या केळ्यानं शरीरातल्या पांढऱ्या पेशी वाढतात. मासिक पाळीच्या वेळी होणारा मानसिक आणि शारीरिक त्रास कमी करण्यासाठी पिकलेलं केळं उत्तम आहे.

Trending Now