जॉन सीनाने शाहरूखबद्दल असं काही म्हटलं जे तुम्हालाही आवडेल!

09 जुलै : बॉलिवूडचा किंग असलेला शाहरुख खानचे फॅन्स तर जगभरात आहेत. यामध्ये आता डब्ल्युडब्ल्युईचा सुपरस्टार जॉन सीनाही सहभागी झाला आहे. याचा पुरावा त्याने नुकताच आपल्या ट्विटर हँडलवर एक पोस्ट शेअर करुन दिलाय.शाहरुख खान हा भारताचा पहिला कलाकार आहे ज्याने गेल्या वर्षी 'टेड टॉक्स' या प्रसिद्ध कार्यक्रमात भाषण केले होते. त्या भाषणामध्ये स्वतःबद्दल, सोशल मीडिया आणि माणुसकी अशा प्रकारचे प्रेरणादायी विषयांचा समावेश होता.शाहरुखने केलेले काही वाक्यं अनेक जण वाचतात आणि फाॅलो करतात. जाॅन सिनालाही शाहरुखचे विचार पटले आणि शाहरुखने म्हटलेलं  "कोणतेही ताकद आणि दारिद्र यापैकी कोणीही तुमचे जीवन अधिक रोमांचक किंवा कमी त्रासदायक करू शकत नाही" हे विचार टि्वट केले.

 

जाॅन सिनाने टि्वट केल्यानंतर शाहरुखने आभार मानले आणि जाॅन सिना हा लहान मुलांचा हिरो आहे. चांगल्या गोष्टी शेअर करण्यासाठी आभार मानले.

शाहरुखने केलेल्या कौतुकाने जॉन सिना भारावून गेला. तो म्हणतो, "तुमचे शब्द खूप लोकांपर्यंत पोहोचतात, त्यातून अनेकांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य उमटते आणि विचार करण्यास ताकद मिळते. तुम्ही जसे आहात त्यासाठी मनापासून आभार"एक स्टार दुसऱ्या स्टारचे कौतुक करतोय हे काही पहिल्यांदा घडत नाहीय. याआधीही जॉन सिनाने शाहरुख विषयी ट्विट केले होते. त्यावर शाहरुखनेही थँक्स असा रिप्लाय दिला होता.

मागील वर्षी जाॅन सिनाने दिल्लीत इव्हेंटसाठी आला होता तेव्हाने त्याने माजी क्रिकेटर कपील देव आणि राहुल द्रविड यांच्याबदल इन्स्टांग्राम अकाऊंटवर फोटो पोस्ट केले होते.

माजी क्रिकेटर कपील देव यांच्याबद्दल जाॅन सिनाने शेअर केलेली पोस्ट

Trending Now