गुगल म्हणतंय, सलमान बाॅलिवूडचा सर्वात बेकार अभिनेता!

तीन दिवसांत रेस 3 बाॅक्स आॅफिसवर धुमाकूळ घातलाय. तीनच दिवसात रेस-3ने 100 कोटींची कमाई केलीये.

Sachin Salve
मुंबई, 18 जून : प्रत्येक वर्षी ईदच्या दिवशी नवीन सिनेमा घेऊन धमाल उडवणार दंबग खान अर्थात सलमान खान सगळ्यात "worst Bollywood Actor" अभिनेता असल्याचा किताबच गुगलने देऊ केलाय.ईदच्या दिवशी सलमान खानचा रेस 3 रिलीज झाला. तीन दिवसांत रेस 3 बाॅक्स आॅफिसवर धुमाकूळ घातलाय. तीनच दिवसात रेस-3ने 100 कोटींची कमाई केलीये. पहिल्याच दिवशी रेस-3 ने 29 कोटींची कमाई केलीये.

पण रेस-3ने 100 कोटी जरी कमावले असले तरी सोशल मीडियावर या सिनेमातील डाॅयलाॅग आणि अॅक्शन सीनची खिल्ली उडवली जात आहे. गुगलवर जर तुम्ही worst Bollywood Actor असं सर्च केलं तर सलमान खान हा सर्वात बेकार अभिनेता असल्याचं दाखवतोय.बिग बाॅस हिंदीच्या नव्या सिझनमध्ये असणार 'ही' पाॅर्न स्टार! आता भाईजानला बेकार अभिनेता म्हटल्यावर याचे स्क्रीनशाॅर्ट काढून सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. काही जण तर "आम्हाला आधीच माहिती होतं पण गुगलला आता कळलं, त्यामुळे सलमान बेकार अभिनेता आहे" अशी खिल्ली उडवत आहे.संजय राऊत बनवणार जाॅर्ज फर्नांडिसांवर सिनेमा गुगल काही म्हणो, पण भाईजानचा जलवा बाॅक्स आॅफिसवर कायम असतो. रेस-3 हा सिनेमा बाॅक्स आॅफिसवर सर्वात जास्त गल्ला कमावणारा हा त्याचा तिसरा सिनेमा ठरलाय. याआधीही सुलतानने 36 कोटी तर एक था टायगरने 32 कोटींची कमाई केली होती.

Trending Now