कर्नाटकचे राज्यपाल 'भाजप आणि संघा'चे प्रतिनिधी म्हटल्याने उदय चोपडा ट्विटरवर झाला ट्रोल

कर्नाटकची ही निवडणुक एक एतिहासिक आणि अभूतपूर्व अशीच होती. यावर सर्व स्तरातून तिव्र प्रतिक्रिया उमटल्या. यातसंदर्भात बॉलिवूड अभिनेता उदय चोपडाने असं काही ट्विट केलं की तो सोशल मीडियावर भन्नाट ट्रोल झाला.

Renuka Dhaybar
17 मे : कर्नाटकात अखेर भाजपचा झेंडा फडकला आहे. आजच नुकतंच भाजपच्या येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दरम्यान, कर्नाटकची ही निवडणुक एक एतिहासिक आणि अभूतपूर्व अशीच होती. यावर सर्व स्तरातून तिव्र प्रतिक्रिया उमटल्या. यातसंदर्भात बॉलिवूड अभिनेता उदय चोपडाने असं काही ट्विट केलं की तो सोशल मीडियावर भन्नाट ट्रोल झाला.उदयने या ट्विटमध्ये लिहलं की, "मी कर्नाटकच्या राज्यपालांबद्दल गुगलवर शोधलं. ते भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न आहे. मला असं वाटतं की आता आपलं काय होणार हे आता सगळ्यांनाच माहित आहे?'

पण उदय चोपडाचं हे ट्विट त्याच्या चाहत्यांना काही आवडलं नाही. त्यामुळे त्यांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली. बॉलिवूडचा राहुल गांधी असं ट्विट करत त्याच्या चाहत्यांनी त्याला सोशल मीडियावर ट्रोल केलं.

उदय चोपडाच्या या ट्विटवर ऐवढ्या टिका झाल्यानंतर त्याने आणखी एक ट्विट लिहलं. आणि त्यात तो म्हणाला की, ''माझ्या ट्विटवर इतकं ट्रोल केलं. पण मी एक भारतीय नागरिक आहे. मला भारताची काळजी आहे.' पण तुमच्या विचारांना डावलण्याची माझी हिमत्त नाही.' असंही तो पुढे म्हणाला.

 

Trending Now