Indian Idol च्या ऑडिशनची आतली गोष्ट, 'पाणी मागितले म्हणून कानशिलात लगावली'

24 आॅगस्ट : गायनक्षेत्रातील रिअॅलिटी शोमध्ये इंडियन अॉयडलचा जगभरात बोलबाला आहे. भारतातही हा कार्यक्रम चांगलाच लोकप्रिय आहे. इंडियन अॉयडलचा दहावा सीझन सध्या सुरू आहे. गायक होण्याचं स्वप्न उराशी बाळगून अनेक नवोदीत गायक यात सहभागी होतात. पण या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेलेल्या एका स्पर्धकाला वाईट अनुभव आला त्याने याबद्दल सोशल मीडियावर आपला अनुभव शेअर केलाय.निशांत कौशिक असं या स्पर्धकाचं नाव आहे. त्याने आपला अनुभव टि्वट केलाय. त्याच्या या टि्वटमुळे एकच खळबळ उडाली आहे. एकापाठोपाठ त्याने अनेक टि्वट केले आहे. त्याचे हे टि्वट चांगलेच ट्रेंड झाले आहे.

निशांत हा 2012 मध्ये इंडियन आॅयडॉलमध्ये सहभागी होण्यासाठी मुंबईत आला होता. उन्हाळ्याच्या मे महिन्यात ही स्पर्धा सुरू होती. सकाळी पाचवाजेपासून स्पर्धकांनी रांग लावली होती. पण जवळपास ना पाण्याची सुविधा होता ना शौचालयाची. पाच वाजेपासून स्पर्धक तसेच रांगेत उभे होते. रांग सोडली तर आपली जागा जाईल अशी भीती सर्वांना होती म्हणून कुणीही आपली जागा सोडली नाही.

पाणी आणि शौचालयासाठी विचारणा केली तर इंडियन आॅयडलचे आयोजक कोणतेही उत्तर देत नव्हते. दुपारी एक वाजता सर्वांना एका स्टेजकडे जाण्यासाठी सांगितलं. तिथे इंडियन आयडलचा एक जुना स्पर्धक गाणं गात होता. तिथून जवळ फक्त एक पाण्याचा टँक होता आणि एक शौचालय होते. पण गर्दी इतकी होती की त्यांना ते पुरेसं नव्हतं. त्यामुळे गर्दीतल्या एका स्पर्धकाने आयोजक सुरक्षारक्षकाला विचारणा केली असता त्यांच्या बाचाबाची झाली आणि त्याने सर्वांसमोर त्या तरुणांचा कानशिलात लगावली. घडलेल्या प्रकारामुळे सर्वच जण आवाक झाले.

निशांतचे टि्वट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअऱ होत आहे. मात्र, इंडियन आॅयडलच्या आयोजकांकडून याबद्दल कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.VIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत धावली बाईक

Trending Now