'या' आहेत दीपिकाच्या फॅशन कलेक्शनमधल्या सर्वात महत्त्वाच्या वस्तू

सध्या बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरावर असलेल्या दीपिका पदुकोणचे कोट्यवधी चाहते आहेत. अभिनयासह फॅशनमध्येदेखील तिने आपणच नंबर वन असल्याचे अनेकदा दाखवून दिले आहे. अभिनयात तर ती अग्रणी आहेच पण आत्तापर्यंत तिच्या फॅशनसेन्समध्येही खूप फरक पडला आहे. तुम्हाला हे माहिती आहे का की, दीपिकाच्या कपड्यांची निवड वेगळीच आहे. आज आम्ही तुम्हाला दीपिकाला कसे कपडे आवडतात ते सांगणार आहोत

दीपिका काळ्या रंगाचे कपडे घालण्यास जास्त पसंती देते. तिच्या कपाटात तुम्हाला काळ्या रंगाचे कपडे अधिक दिसून येतील. तुम्ही दीपिकाला सिनेमांत साडीमध्ये अनेकदा पाहिलं असेलच. खऱ्या आयुष्यातही तिला साडी नेसायला आणि लाँग कुर्ती घालायला खूप आवडते. दीपिका मुळची उंच असल्याने ती पायात हिल्सऐवजी स्निकर्स घालण्यास अधिक पसंती देते. बऱ्याच वेळा ती स्किन कलरची बॅग वापरताना दिसली आहे. त्यामुळे तिच्य़ा बॅग कलेक्शनमध्ये स्किन कलर हा तिचा आवडता कलर आहे. वेस्टर्न लूकमध्ये तिला पांढऱ्या रंगाचा टॉप आणि डेनिम घालायला जास्त आवडते.

Trending Now