रजनीकांतचा 'काला' रिलीज, फॅन्ससाठी हा उत्सव!

सुपरस्टार रजनीकांत यांचा काला हा सिनेमा आज रिलीज झाला. या सिनेमात रजनी यांच्यासोबत नाना पाटेकर, अंजली पाटील, हुमा कुरेशी यांच्याही मुख्य भूमिका आहेत.

Sonali Deshpande
मुंबई, 07 जून : सुपरस्टार रजनीकांत यांचा काला हा सिनेमा आज रिलीज झाला. या सिनेमात रजनी यांच्यासोबत नाना पाटेकर, अंजली पाटील, हुमा कुरेशी यांच्याही मुख्य भूमिका आहेत. या सिनेमाची दक्षिण भारतात प्रचंड उत्सुकता आहे. रजनीच्या फॅन्सनी अॅडव्हान्स बुकिंगसाठी मोठ्या रांगा लावल्यात. केरळमधील एका आयटी कंपनीतील कर्मचाऱ्यांनी हा सिनेमा पाहण्यासाठी सुट्टीची मागणी केलीय. तर कंपनीनेही कर्मचाऱ्यांच्या आग्रहाला मान देत ही सुट्टी मंजूर केलीय.मुंबईत आयमॅक्स वडाळाच्या वतीनं पहाटे 4 पासून विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. तर माटुंग्याच्या अरोरा सिनेमामध्ये रजनी फॅन्ससाठी खास शो आहे.धारावीत राहणाऱ्या एका डाॅनची ही कथा आहे. तामिळ भाषेतला हा सिनेमा रजनी फॅन्ससाठी पर्वणीच आहे. रिलीज होण्याआधी थिएटर आणि म्यझिक राइट्समधून काला सिनेमानं 230 कोटींचा गल्ला कमावला आहे.

Trending Now