VIDEO : सलमानच्या गाण्यावर टायगर श्राॅफच्या डान्सचा अनोखा अंदाज

त्याने शेअर केलेला हा नवा व्हिडिओ पाहिलात तर याबाबतचं तुमचं मत नक्की बदलेल. आपल्या डान्सिंग पार्टनर्ससोबतचा एक व्हिडिओ नुकताच त्याने सोशल मीडियावर शेअर केलाय.

मुंबई, 25 जुलै : टायगर श्रॉफ सध्या त्याच्या आगामी सिनेमाची जोरदार चर्चा करतो. एरवी त्याच्या मस्क्युलर बॉडीची चर्चा होते मात्र त्याच्या डान्सिंग स्किल्सची फारशी चर्चा होत नाही. मात्र त्याने शेअर केलेला हा नवा व्हिडिओ पाहिलात तर याबाबतचं तुमचं मत नक्की बदलेल. आपल्या डान्सिंग पार्टनर्ससोबतचा एक व्हिडिओ नुकताच त्याने सोशल मीडियावर शेअर केलाय. यात तो सलमान खानच्या गाजलेल्या तुझे अक्सा बीच घुमादुं आ चलती क्या या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसतोय. हे गाणं आपल्या डान्स फॉर्ममध्ये सादर करण्याच्या टायगरच्या या प्रयत्नाला त्याच्या फॅन्सनी पसंती दिलीय.

टायगर श्राॅफ सध्या स्टुडंट आॅफ द इयर 2 सिनेमात बिझी आहे. याशिवाय बागी 3 मध्येही तो दिसणार आहे. बागी 2नं त्याला चांगलं यश मिळवून दिलं होतं.  बागी 2साठी टायगर श्रॉफने 5 किलो वजन वाढवलं होतं. त्याचबरोबर हेअरस्टाईलही नवी केली होती. त्या सिनेमात दिशा पटनानीही होती. दोघांच्या प्रेमसंबंधाच्या चर्चा बऱ्याच रंगल्या होत्या.हेही वाचा

VIDEO : 'कौन बनेगा करोडपती 10'चा नवा प्रोमो पाहिलात का?

स्पृहा जोशीमुळे तेजश्री प्रधानला डच्चू

VIDEO JACKIE SHROOF : ... म्हणून जॅकी श्रॉफ लखनऊत झाला ट्रॅफिक हवालदार

सलमान खान नेहमीच टायगरचं कौतुक करतोय. आणि आता त्याच्याच गाण्यावरचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय.

Trending Now