या सगळ्या कलाकारांचा आहे साईड बिझनेस, कमवतात बक्कळ पैसा

बॉलिवूड कलाकार हे असे व्यक्ती आहेत जे सर्वाधिक कमाई करणाऱ्यांमध्ये मोडतात. या कलाकारांची एका चित्रपटाची कमाई ही कोटींच्या घरात असते. तुम्हाला हे माहिती आहे का की सिनेसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत जे चित्रपटांवेतेरिक्त इतर व्यवसायातूनही कमाई करतात. चला तर मग जाणून घेऊयात अशा काही कलाकारांच्या पार्ट टाईम जॉब बद्दल. जॉन अब्राहम - जॉनने आत्तापर्यंत धूम, हाऊसफूल, फोर्स आणि परमाणू यासारख्या अनेक हिट चित्रपाटांतून प्रेक्षकांमध्ये आपली वेगळी छाप पाडली आहे. चित्रपाटांमध्ये काम करण्यासोबत त्याने प्रोडक्शन हाऊस काढलंय. यामधून त्याने विकी डोनर, परमाणू आणि सत्यमेव जयते या चित्रपटांची निर्मिती केली आणि भरभक्कम पैसा कमावला आहे. माधूरी दीक्षित - बॉलिवूडची धकधक गर्ल या नावाने प्रसिद्ध असलेल्या माधूरी दीक्षितने अनेक गाण्यांवर आपले पाय थिरकवले आहेत. आता तिने ऑनलाईन डान्स अॅकॅडमी सुरू केली आहे ज्याचं नाव 'डान्स विथ माधूरी' असं आहे. त्यामुळे तिलाही तिच्या या साईट बिझनेसमधून करोडोंचा फायदा होतोय.

अजय देवगण –बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्यांमधलं एक नाव म्हणजे अजय देवगण. गुजराच्या चरनका या सौरउर्जा प्रकल्पात त्याची मोठी गुंतवणूक आहे. त्याचा त्याला खूप फायदाही होतो. रोहा ग्रुपमध्येही अजय देवगणची गुंतवणूक आहे. करिश्मा कपूर – ९०च्या दशकातील नंबर वन अभिनेत्री करिश्मा सध्या चित्रपाटांपासून लांब आहे. कारण ती स्वतःचा ई-कॉमर्स पोर्टल चालवते. ज्यामध्ये बेबी प्रोडक्ट्स पासून ते मदर केअर प्रोडक्ट्सपर्यंत सगळ्या वस्तू मिळतात. सुनिल शेट्टी – चित्रपाटांव्यतेरिक्त सुनिल शेट्टी अनेक साईड बिझनेस करतो. फिटनेसची तर त्याला भारी आवड आहे. त्यामुळे त्याने जिम सुरू केली आहे. आता संपूर्ण भारतात त्याच्या शाखा आहेत. त्याचबरोबर मुंबईमध्ये त्याचं रेस्टॉरंट आणि नाईटक्लब आहेत. त्याचे पॉपकॉर्न एंटरटेंमेंट या नावाचे एक प्रोडक्शन हाऊसदेखील आहे. त्यामुळे सुनिल शेट्टी फुल प्रॉफिटमध्ये आहे असं म्हणायला हरकत नाही. अर्जुन रामपाल - अर्जून रामपाल हा अभिनयासोबत एक यशस्वी मॉडेल देखील आहे. त्याने अनेक चित्रपाटांमध्ये काम केलं आहे पण बॉलिवूडमध्ये त्याला काही त्याची खास अशी ओळख बनवता आली नाही. त्यामुळे त्यानेही साईड बिझनेस सुरू केला. दिल्लीमध्ये त्याचा LAP या नावाचा लाउंज-बार-रेस्टॉरंट आहे. त्याचबरोबर त्याची एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीसुद्धा आहे. ज्याचे नाव 'चेसिंग गणेशा.' या सगळ्या व्यवसायामंधून त्यालाही चांगलाच फायदा होतो. मंडळी या सगळ्यातून तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का, की कितीही काहीही असूद्या आपली आवड जपण्यासाठी का होईना पण साईड बिझनेस हा हवाच. शेवटी एका दगडावर पाय देऊन किती वेळ उभं राहणार.

Trending Now