कोण आहे नवाजुद्दीनची ही मिस्ट्री गर्ल?

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने नुकतंच त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एका तरूणीसोबतचा फोटो शेअर केला होता. ही मिस्ट्री गर्ल नक्की कोण याची चर्चा सुरू झाली होती.

मुंबई, 20 जुलै : अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने नुकतंच त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एका तरूणीसोबतचा फोटो शेअर केला होता. ही मिस्ट्री गर्ल नक्की कोण याची चर्चा सुरू झाली होती. नवाजने या फोटोत ये लडकी मेरे रोम रोम में बसती है असं लिहिल्याने ही चर्चा अधिकच वाढली. अखेर या चर्चेला पूर्णविराम मिळालाय. ही तरूणी इटालियन अभिनेत्री व्हेलेंटिना कॉर्टी असून नवाजसोबतच्या आगामी सिनेमात ती मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमाचं शूटिंग सध्या रोममध्ये सुरू आहे.

या सिनेमाचं दिग्दर्शन शर्मिष्ठा चॅटर्जी करतायत. शर्मिष्ठा आणि नवाज यांची मैत्री एकदम जुनी. मान्सून शूटआऊट, लायन, देख इंडियन सर्कस या सिनेमांत दोघंही एकत्र दिसले होते.नवाजुद्दीनच्या ठाकरे सिनेमाकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय. बाळासाहेब ठाकरेंवर बनत असलेल्या या सिनेमात ठाकरेंची भूमिका साकारायचं आव्हान नवाजनं स्वीकारलंय.

Trending Now