PHOTOS : तैमुरवरचा लाईमलाईट आता त्याच्या या गोड आतेबहिणीवर!

सैफ आणि करिनाचा मुलगा तैमुर अली खान जन्माला येण्याआधीपासूनच चर्चेत आहे. पण सोहा अली खान आणि कुणाल खेमूच्या या चिमुरडीची छबी प्रसारमाध्यमांनी टिपली आणि लाइमलाइट तैमुरच्या या आत्तेबहिणीवर - इनाया नवमी खेमूवर पडला.

सोहा अली खान आणि कुणाल खेमूच्या या गोड चिमुरडीची छबी प्रसारमाध्यमांनी टिपली आणि आपला मामेभाऊ तैमुरवरचा लाईमलाईट या इनाया नवमी खेमूवर पडला. पतौडी आणि शर्मिला यांची लेक सोहा अली खान आणि अभिनेता कुणाल खेमू यांनी आपल्या लेकीचं नाव इनाया ठेवल्याचं माध्यमांना माहिती होतं. पण तिची ही गोड छबी फार वेळा बाहेर दिसली नव्हती. सोहा- कुणालच्या घराजवळ इनायाचे तिच्या केअर टेकरसोबत फिरतानाचे तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरलही झालेत.

मुंबईत खार या उपनगरात फिरतानाचे इनायाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर ट्रेण्ड होत आहेत. जांभळ्या रंगाच्या टॉपमध्ये इनाया कोणत्याही बाहुलीपेक्षा कमी सुंदर दिसत नव्हती. आतापर्यंत इनायाचे आईसोबतचे हे असे फोटो काही वेळा सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सैफ आणि करिनाचा मुलगा तैमुर अली खान जन्माला येण्याआधीपासूनच चर्चेत आहे. नुकताच तैमुर आई-वडिलांसोबत मालदीवला गेला होता. तैमुरला घेऊन ट्रीपला गेलेलं संपूर्ण खान कुटुंब नुकतंच आपल्या छोट्या व्हेकेशनवरून परतलं.

Trending Now