करण जोहरच्या मुलांसोबत तैमूरनं केली मस्ती, VIDEO व्हायरल

तैमूरला आपले मित्र रुही आणि यशसोबत खेळायचं होतं. मग काय? करिनाचं काहीच चालेना. तिला तैमूरला घेऊन करण जोहरकडे जावं लागलं.

मुंबई, 23 जुलै : बाॅलिवूडचे सगळे स्टार्स परदेशात सुट्टी एंजाॅय करून भारतात परत येतायत. शाहरूख खान, सैफ अली-करिना, अक्षय कुमारचं कुटुंब सगळ्यांच्या सुट्ट्या आता संपल्यात. पण छोट्या तैमूरची सुट्टी काही संपता संपत नाही. तैमूरला आपले मित्र रुही आणि यशसोबत खेळायचं होतं. मग काय? करिनाचं काहीच चालेना. तिला तैमूरला घेऊन करण जोहरकडे जावं लागलं. आणि तिथं तिघांनी एकच धमाल केलीय. तो व्हिडिओ व्हायरल झालाय.

या बच्चेकंपनीला पालकांनी एक टब दिला. त्यात खूप बाॅल्स टाकले आणि मग एकच धमाका उडवला या छोट्यांनी. करण जोहरनंच हे सर्व शूट केलं आणि आपल्या इन्स्टाग्रामवर टाकून दिलं. त्याला लाईक्सही भरपूर मिळाल्या.स्टारकिड्समध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय ते तैमूरनं. तैमूरच्या बाललीलांचं सगळीकडे कौतुक होतंय. इतकं की मध्यंतरी आजी शर्मिला टागोरनं तैमूरला या सगळ्यापासून दूर ठेवा असं सांगितलं होतं.

Trending Now