Bhima Koregaon- मोदी सरकारविरोधात स्वरा भास्करनं केलं मोठं विधान

 वादात अडकण्याची स्वराची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेकदा तिने वादग्रस्त विधानं केली आहेत

नवी दिल्ली, २ सप्टेंबर- आपल्या वादग्रस्त विधानांसाठी नेहमीच चर्चेत असलेली बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने भाजप सरकारविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. महात्मा गांधींच्या हत्येनंतर आनंद साजरा करणारे सत्तेत बसल्याचं वादग्रस्त विधान अभिनेत्री स्वरा भास्करनं केलं आहे. नवी दिल्लीत ती पत्रकारांशी बोलत होती. समाजाबाबत आपलं मत मांडताना तिनं इतिहासातील अनेक गोष्टींवर भाष्य केलं.

वीरे दी वेडिंग या करिना कपूरच्या सिनेमात स्वरा भास्करनं सहअभिनेत्री म्हणून भूमिका केलीय. वादात अडकण्याची स्वराची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेकदा तिने वादग्रस्त विधानं केली आहेत.VIDEO : धावत्या लोकलच्या दारात तरुणीची स्टंटबाजी

Trending Now