स्वप्नील जोशीच्या लेकाचा 'हा' व्हिडिओ पाहिलात का?

असं म्हणतात मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. अभिनयाचंही बालकडू घरातून मिळावं लागतं. अनेक अभिनेत्यांच्या आणि अभिनेत्रींच्या मुलांना ते मिळतंच.

मुंबई, 9 सप्टेंबर : असं म्हणतात मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. अभिनयाचंही बालकडू घरातून मिळावं लागतं. अनेक अभिनेत्यांच्या आणि अभिनेत्रींच्या मुलांना ते मिळतंच. असाच एक तारा उगवणार आहे. अभिनेता स्वप्नील जोशीचा मुलगा राघवचं स्क्रीनवर पदार्पण होतंय.नुकताच इन्स्टाग्रामवर स्वप्नील जोशीनं एक व्हिडिओ टाकलाय. जाॅन्सनच्या जाहिरातीत राघव आपल्या आईबाबांबरोबर दिसणार आहे.  स्वप्नील आणि लीना यांना मायरा आणि राघव अशी दोन मुलं आहेत. मायराचा जन्म २३ मे २०१६ रोजी झाला तर राघवचा जन्म ७ डिसेंबर २०१७ला झाला आहे.मराठी इंडस्ट्रीतला हा सुपरस्टार घरी आपल्या मुलांचा लाडका बाबाच असतो. स्वप्नील राघवला रोज स्वत: न्हाऊमाखू घालतो. त्या व्हिडिओत स्वप्नीलनं राघवच्या बाबतीत बऱ्याच गोष्टी शेअर केल्यात. राघवही या शूटमध्ये एंजाॅय करताना दिसत होता.

स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांची जादू पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. मुंबई-पुणे मुंबईचे दोन्ही भाग हिट झाले होते. 'मुंबई पुणे मुंबई' या आठ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला मोठे यश मिळाले आणि त्यातून त्याच्या दुसऱ्या भागाची निर्मिती झाली. त्याशिवाय पहिल्या भागाची अनेक भाषांमध्ये पुनर्निर्मिती झाली.या चित्रपटाची वाहवा संपूर्ण जगातील सिनेरसिकांकडून झाली. प्रेक्षकांनी केलेल्या विनंतीला मान देऊन या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची निर्मिती केली गेली होती. स्वप्नील आणि मुक्ता ही जोडी रसिकांना खूपच भावली होती. दोन्ही चित्रपटांना सिनेरसिकांकडून फार मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला होता.  या सिनेमाच्या सीरिजमधल्या तिसऱ्या सिनेमाचं पोस्टर नुकतंच रिलीज झालं.Birthday Special : जेव्हा आमिरच्या सिनेमातून अक्षयला बाहेर काढलं होतं

Trending Now