'जय मल्हार'च्या म्हाळसाची गुड न्यूज!

'जय मल्हार' या मालिकेतील 'म्हाळसा देवी'च्या भूमिकेद्वारे घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री सुरभी हांडेच्या आयुष्यात एका खास व्यक्तीचं आगमन झालंय.

मुंबई, 27 आॅगस्ट : तुम्हाला सुरभी हांडे आठवतेय का? विसरला असलात तर जय मल्हार मालिका आठवा. हो, त्यातली कोपिष्ट म्हाळसा. खंडोबाची बायको म्हाळसा.  म्हणजेच सुरभी हांडे. खंडोबा,म्हाळसा आणि बानू हे लोकप्रिय झाले होते.  घराघरात ही मालिका फार आवडीनं पाहिली जायची. म्हाळसा आणि बानू यांची भांडणं, खंडेरायाची दोघांमध्ये होणारी ओढाताण प्रेक्षकांना आवडली होती.शिवाय मालिकेमधले भव्य दिव्य सेट्स,वेशभूषा,दागिने हे सर्वच दिपवणारं होतं.'जय मल्हार'च्या टीआरपी यशानंतर टीव्हीवर पौराणिक मालिकांचा ट्रेंडच निर्माण झाला होता. तर त्यातल्या म्हाळसेची गुड न्यूज आहे.'जय मल्हार' या मालिकेतील 'म्हाळसा देवी'च्या भूमिकेद्वारे घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री सुरभी हांडेच्या आयुष्यात एका खास व्यक्तीचं आगमन झालंय. सुरभीच्या आयुष्यात आलेल्या या खास व्यक्तीचं नाव आहे दुर्गेश कुलकर्णी. नुकताच रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर जळगावमध्ये या दोघांचा साखरपुडा पार पडला. दुर्गेश काय करतो आणि त्याची सुरभीशी पहिली भेट नक्की कुठे झाली ते अद्यापही गुलदस्त्यात आहे, मात्र त्यांनी साखरपुडा करण्याचा निर्णय घेतलाय.

मित्रपरिवार आणि आप्तेष्टांच्या उपस्थितीत त्यांचा साखरपुडा पार पडला असला तरीही लगेचंच लग्नगाठ बांधायची नाही असंही त्यांनी ठरवल्याचं समजतंय. सोशल मीडियावर सुरभीने साखरपुड्याचे फोटोज टाकल्यावर या गोष्टीचा उलगडा झालाय.सुरभीनं 16व्या वर्षी स्वामी या नाटकात काम केलंय. 'अगबाई अरेच्चा 2'मध्ये तिची भूमिका होती. स्टँड बाय या हिंदी सिनेमातही तिची भूमिका होती. पण सुरभी घराघरात पोचली ती म्हाळसेच्या रूपात. बानू आणि म्हाळसाची जुगलबंदी चांगलीच रंगली होती. जय मल्हार ही मालिका नंबर वन मालिका होती.PHOTOS : अशी रंगली भैरवीची मंगळागौर

Trending Now