पुंडलिकाची वारी पूर्ण होईल का?

पुंडलिकाचा हा प्रवास पूर्ण झाला तर कलीच्या अस्तित्त्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होणार

मुंबई, 10 जुलैः संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम यांच्या पालख्यांची पंढरीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. ज्ञानोबा- तुकोबा आणि विठूनामाचा गजर करत, वैष्णव तल्लीन होऊन रिंगण करत, मुक्काम करत पायी पंढरपूरला आषाढीला भेटणार आहेत. वारीचा हाच सगळा प्रवास स्टार प्रवाहच्या विठूमाऊली या मालिकेतून उलगडणार आहे. आईला संकटातून वाचवण्यासाठी निघालेल्या पुंडलिकाची वारी पूर्ण होणार का, हे 'विठूमाऊली' मालिकेत पाहायला मिळणार आहे.पुंडलिकाच्या आईवर संकट आलं आहे. त्यातून तिला बाहेर काढण्यासाठी विठ्ठल पुंडलिकाला पायी लोहदंड क्षेत्री यायला सांगतात. पुंडलिकाचा हा प्रवास पूर्ण झाला तर कलीच्या अस्तित्त्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे. त्यामुळे कली पुंडलिकाच्या प्रवासात अडथळे आणतो. कलीने निर्माण केलेल्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी पुंडलिकाला विठ्ठल कशाप्रकारे मदत करतो आणि पुंडलिक लोहदंड क्षेत्रापर्यंत पोहोचतो का, या प्रश्नाचं उत्तर पुढील काही भागांतून मिळेल.तसंच डोक्यावर तुळस का घेतली जाते, गंधाचा टिळा का लावला जातो, रिंगणाचे खेळ का खेळतात अशा वारीतल्या परंपरांमागील कारणंही कळणार आहेत. त्यासाठी न चुकता पहा 'विठूमाऊली' सोमवार ते शनिवार सायंकाळी ७ वाजता फक्त स्टार प्रवाहवर!

कर्करोगग्रस्त सोनाली बेंद्रे आता दिसतेय अशी, समोर आला फोटोअशा पद्धतीने सोनालीने केला हेअर कट ... म्हणून हरमनप्रीत कौरकडून काढून घेतली डीएसपीची नोकरी

Trending Now