सुहानाच्या वाढदिवसाला शाहरुखनं लिहिली भावुक पोस्ट

त्यानं म्हटलंय, 'मला माहीत आहे की तू उडण्यासाठीच जन्मलीयस.' गौरी खाननंही तिचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलाय.

Sonali Deshpande
२३ मे : शाहरुख खानची मुलगी सुहाना खान काल म्हणजे २२ मे रोजी १८ वर्षांची झाली. त्या निमित्तानं पप्पा शाहरुख खाननं तिला सोशल मीडियावर एक इमोशनल पोस्ट लिहिलीय. त्यानं म्हटलंय, 'मला माहीत आहे की तू उडण्यासाठीच जन्मलीयस.' गौरी खाननंही तिचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलाय.शाहरुखनं म्हटलंय, ' सगळ्या मुलींप्रमाणे तूही उडण्यासाठी बनलीयस. तू जे १६ वर्षांपासून करत होतीस, ते आता सर्व काही कायद्यानं करू शकतेस. 'किंग खानचा सुहानावर खूप जीव आहे. तो अगदी मित्राप्रमाणे मुलांशी वागतो. इन्स्टाग्रामवरच्या या पोस्टला ६ लाख लाईक्स मिळाल्या आहेत.

Trending Now