सोनम कपूरच्या पार्टीत शाहरुख-सलमानचा जलवा!

सलमान आणि किंग खाननं मिळून चक्क करण अर्जुन सिनेमातलं गाणं गायलं आणि तो व्हिडिओ व्हायरलही झालाय.

Sonali Deshpande
09 मे : बाॅलिवूडचं सर्वात गाजलेलं लग्न म्हणजे सोनम कपूरचं. सोनमच्या रिसेप्शन पार्टीत शाहरूख खान आणि सलमान खान अक्षरश: छा गये म्हणता येईल. दोघांनी या पार्टीला अगदी चार चांद लावले. सलमान आणि किंग खाननं मिळून चक्क करण अर्जुन सिनेमातलं गाणं गायलं आणि तो व्हिडिओ व्हायरलही झालाय.दोघांनी सोनम कपूरची आई सुनीता कपूरला उद्देशून हे लोकप्रिय गाणं गायलं, तेही अगदी गुडघ्यावर बसून. यावेळी सुनीता कपूरही अगदी लाजून गेल्या.

काल रात्री सोनम कपूर आणि आनंद अहुजा यांच्या लग्नाचं रिसेप्शन द लीला हॉटेलमध्ये पार पडलं. या सोहळ्यालाही बॉलिवूड लोटलं होतं. आणि या रिसेप्शनमध्ये अनिल कपूर, शाहरुख खान, सलमान खान, अर्जुन कपूर यांनी धम्माल डान्स केला.रिसेप्शनला रेखा, शाहरुख, सलमान, कतरिना, अभिषेक, ऐश्वर्या, माधुरी दीक्षित, जॅकलिन फर्नांडिस, सुनील शेट्टी,  कंगना राणावत, जुही चावला, अंबानी कुटुंबीय, शाहीद आणि मीरा कपूर, जॅकी श्रॉफ, रणवीर सिंग, संजय लीला भन्साळी, वरुण धवन यांच्यासह अनेक सेलिब्रिटीजही आवर्जून उपस्थित होते.

Trending Now