कशी आहे सोनाली बेंद्रेची तब्येत?, सांगतेय तिची नणंद

आता तिच्या तब्येतीची माहिती तिची नणंद सृष्टी आर्यानं दिली.

मुंबई, 01 आॅगस्ट : सोनाली बेंद्रे सध्या न्यूयाॅर्कमध्ये कॅन्सरवर उपचार करतेय. सगळ्यांनाच तिच्या तब्येतीची काळजी वाटतेय. पण सोनाली एकदम दिलखुलास आहे. या एवढ्या मोठ्या आजारातही तिनं तिची हिंमत हरवली नाही. उलट आपल्या आजाराची बातमी तिनंच सोशल मीडियावर दिली होती. शिवाय तिनं केस कापले तेही सगळ्यांना सांगितलं होतं.  त्यामुळे आता प्रत्येक जण आता तिचं ट्विट आणि इन्स्ट्राग्राम तपासत असतं.आता तिच्या तब्येतीची माहिती तिची नणंद सृष्टी आर्यानं दिली. सोनाली फार खंबीर असून ती कॅन्सरसारख्या दुर्घर आजाराशी मोठ्या नेटाने दोन हात करत असल्याचं तिने सांगितलं. त्यामुळे सोनालीची प्रकृती आता हळूहळू सुधारत असल्याचं स्पष्ट झालंय. सोनाली बेंद्रेच्या तब्येतीची काळजी प्रत्येकालाच आहे. त्यामुळे या बातमीनं सगळ्यांनी थोडा सुटकेचा श्वास सोडलाय.हेही वाचा

रणवीरच्या चित्रविचित्र पोशाखांमागचं काय आहे गुपित?

बिग बींनी बल्गेरियात रणबीर-आलियाला काय दिलं सरप्राईझ?

'राधा प्रेम रंगी रंगली'मध्ये अजून एक वळण, राधाचा वाढणार संभ्रम

मध्यंतरी सोनालीनं इन्स्ट्राग्रामवर आपल्या मुलाला रणवीरला पत्र लिहिलं.  आपल्या मुलाचा फोटो पोस्ट करत सोनाली लिहिते, ' 12 वर्ष, 11 महिने आणि 8 दिवस आधी ज्या क्षणी रणवीर, माझ्या मुलाचा जन्म झाला त्या क्षणी माझा अॅमेझिंग मुलगा रणवीरनं माझं हृदयच त्याच्या नावे केलं होतं. त्यानंतर माझ्या आणि गोल्डीच्या आयुष्यात रणवीरचा आनंद आणि देखभाल हेच महत्त्वाचं ठरलं. आणि जेव्हा कॅन्सरनं माझ्या आयुष्यात प्रवेश केला तेव्हा आमच्या पुढे एक मोठा प्रश्न होता, तो म्हणजे रणवीरला याबद्दल कसं सांगायचं?आम्हाला त्याची जेवढी काळजी होती, तेवढंच सत्य सांगायचं होतं. आम्ही आतापर्यंत त्याच्यापासून काही लपवलेलं नाही. आणि आताही सर्व काही खरं खरं सांगितलं. त्यानं सर्व ऐकून घेतलं आणि समजून घेतलं. आणि हे पाहूनच माझ्यात एक प्रकारची शक्तीच आली. आता अनेकदा तो माझा पालक बनतो. काय योग्य, काय अयोग्य ते मला सांगतो.मला असं वाटतं की अशा परिस्थितीत आपल्या मुलांना सत्य सांगावं. अशा वेळी त्यांच्या सोबत जास्त वेळ काढा. पण अनेकदा आपण मुलांना जीवनातलं सत्य सांगत नाही. ते लपवतो. आता रणवीरच्या सुट्ट्या सुरू आहेत. मी त्याच्याबरोबर आहे. त्याचा खोडकरपणा, खोड्या यामुळे माझं लक्ष त्याच्यात असतं. आम्ही एकमेकांची ताकद बनलोय.

Trending Now