सोनाली बेंद्रेचं मुलाला वाढदिवसानिमित्त इमोशनल पत्र

रणवीर, माझा सूर्य, माझा चंद्र, माझं आकाश... तुला हा मेलोड्रामा वाटेल. पण आज तुझा 13वा वाढदिवस आहे. तेव्हा तुझा यावर हक्कच आहे.

मुंबई, 11 आॅगस्ट : सोनाली बेंद्रे सध्या न्यूयाॅर्कला कॅन्सरवर उपचार घेतेय. वेळोवेळी सोशल मीडियावरून ती आपली परिस्थिती कशी आहे, हे सांगत असते. मध्यंतरी तिनं आपल्या मुलाला रणवीरला आपण कॅन्सरबद्दल कसं सांगितलं, याची माहिती दिली होती. पण आता सोनाली खूप खूश आहे. याचं कारणही मोठं आहे.आज 11 आॅगस्ट. या दिवशी रणवीरचा वाढदिवस असतो. इन्स्ट्राग्रामवर तिनं खास पोस्ट लिहिलीय. रणवीरला शुभेच्छा देत ती लिहिते, ' रणवीर, माझा सूर्य, माझा चंद्र, माझं आकाश... तुला हा मेलोड्रामा वाटेल. पण आज तुझा 13वा वाढदिवस आहे. तेव्हा तुझा यावर हक्कच आहे. तू अजून किशोरावस्थेत आहेस, हे मला पटण्यासाठी थोडा वेळ लागेल. मला तुझ्याबद्दल अभिमान वाटतोय. तुझे विचार, तुझा बुद्धिमत्ता, तुझा प्रामाणिकपणा यासोबत तुझा खोडकरपणा. याचा मला अभिमान आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा बाळा. तुझा हा पहिला वाढदिवस आहे, जेव्हा आपण एकत्र नाही. मला तुझी खूप आठवण येतेय. तुला खूप खूप प्रेम.'

मध्यंतरी, सोनालीने फ्रेण्डशीप डेचं औचित्य साधून आपल्या मैत्रिणींसोबतचा एक फोटो शेअर केला होता.  सोनालीने या फोटोसोबत लिहिलेला मेसेज पाहून तुम्ही सकारात्मकही व्हाल. सध्या सोनाली केमोथेरपीचे उपचार घेत असल्यामुळे तिच्या डोक्यावरचे सारे केस गळले. अनेकदा रुग्ण आपलं हे रूप इतरांना दिसू नये म्हणून नैराश्यग्रस्त होतात आणि सर्वांपासून दूर राहणं पसंत करतात. पण सोनाली मात्र या आजाराशी धीराने लढताना दिसत आहे. उपचारांदरम्यान तिला कितीही त्रास होत असला तरी तिच्या चेहऱ्यावरचं हसू तसूभरही कमी झालेलं नाही.

Trending Now