Sonali Bendre: कर्करोगाबद्दल लिहिली 'ही' भावनिक पोस्ट

तात्काळ इलाजांशिवाय कोणताही पर्याय नाही. यापासून पळता येणार नाही. उलट याच्याशी दोन हात करणंच आपल्या हातात आहे

Sonali Deshpande
मुंबई, 04 जुलै: बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे कर्करोगग्रस्त असल्याचे तिनेच सोशल मीडियावर शेअर करुन सांगितले. ती सध्या न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहे. ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो शेअर करत म्हटले की, 'जेव्हा तुम्ही बेसावध असता तेव्हाच आयुष्य तुमच्यावर आघात करतं. मला उच्च दर्जाचा कर्करोग झाल्याचं स्पष्ट झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून मला त्रास होत होता. या त्रासावर उपचार घेण्यासाठी चाचण्या केल्या असता मला कर्करोग झाल्याचे कळले. माझं संपूर्ण कुटूंब आणि मित्र- मैत्रिणी माझ्या पाठिशी आहेत. त्यांनी दिलेल्या पाठिंब्यासाठी मी त्यांचे आभार मानते.''तात्काळ इलाजांशिवाय कोणताही पर्याय नाही. यापासून पळता येणार नाही. उलट याच्याशी दोन हात करणंच आपल्या हातात आहे. जेवढ्या लवकरात लवकर उपचार सुरू करु तेवढंच चांगलं आहे. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार, सध्या मी न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहे. या काळात जास्तीत जास्त आशावादी राहणं फार महत्त्वाचं आहे. मी प्रत्येक पायरीवर लढण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून आप्तेष्टांकडून जो पाठिंबा मिळत आहे त्या प्रत्येकाची मी आभारी आहे. मी या कर्करोगावर विजय मिळवेन, याची मला खात्री आहे. कारण माझे कुटुंब आणि मित्र- मैत्रिणी माझ्या पाठिशी आहेत.'

‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाज’ या रिअॅलिटी शोमध्ये ती परीक्षक होती. मात्र वैयक्तिक कारण सांगत सोनालीने हा शो अर्ध्यावरच सोडला होता. तिच्या जागी बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी दिसणार आहे. विवेक ओबेरॉय आणि उमंग कुमार हेही या शोचे परीक्षक आहेत. ‘सरफरोश’, ‘हम साथ साथ है’ आणि ‘लज्जा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने दमदार भूमिका साकारली आहे.

Trending Now