किमोथेरपीनंतर बदललेला सोनाली बेंद्रेचा लूक पहा

अगदी मुलाशी केलेली चर्चा असो, नाहीतर कापलेले केस. सोनालीनं सगळं फॅन्ससोबत शेअर केलंय.

मुंबई, 5 सप्टेंबर : अभिनेत्री सोनाली बेंद्रे सध्या न्यूयाॅर्कला कॅन्सरवर उपचार घेतेय. वेळोवेळी तिनं सोशल मीडियावर स्वत:च्या तब्येतीबद्दल शेअर केलंय. अगदी मुलाशी केलेली चर्चा असो, नाहीतर कापलेले केस. सोनालीनं सगळं फॅन्ससोबत शेअर केलंय.आता नुकताच तिनं तिचा नवा लूक शेअर केलाय. तिनं पूर्ण टक्कल केलीय आणि आता ती विग लावते. तो व्हिडिओ तिनं इन्स्ट्राग्रामवर टाकलाय.सोनालीनं लिहिलंय, ही आयडिया तिला प्रियांका चोप्रानं दिलीय. तिनं प्रियांकाचे आभारही मानलेत. आणि लिहिलंय, ' कोणाला सुंदर दिसायला आवडणार नाही? त्यासाठी थोडं पाप केलंत तरी हरकत नाही. पण मनाला हवं तसं वागा. त्यासाठी विग आणि लिपस्टिक लावलं तरी चालेल. '

काही दिवसांपूर्वी तिचा नवरा गोल्डी बहेलनं ट्विट करून सोनालीच्या खुशालीची माहिती दिली. तो म्हणतो, सोनालीला तुम्ही इतकं प्रेम दिलंत त्याबद्दल धन्यवाद. तिचे उपचार सुरू आहेत. त्यात कसलाच अडथळा येत नाहीय. पण हा प्रवास खूप मोठा आहे.सोनालीच्या आजारपणात तिचा नवरा, नणंद, मुलगा सगळे नातलग, मित्र मैत्रिणी तिच्या सतत सोबत असतात. आजारी माणसाला हा मोठा अाधार असतो. त्यामुळेच तिची मानसिक स्थिती एवढ्या आजारातही उत्तम राहतेय.काही दिवसांपूर्वी तिच्या तब्येतीची माहिती तिची नणंद सृष्टी आर्यानं दिली. सोनाली फार खंबीर असून ती कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी मोठ्या नेटाने दोन हात करत असल्याचं तिने सांगितलं. त्यामुळे सोनालीची प्रकृती आता हळूहळू सुधारत असल्याचं स्पष्ट झालंय. सोनाली बेंद्रेच्या तब्येतीची काळजी प्रत्येकालाच आहे. त्यामुळे या बातमीनं सगळ्यांनी थोडा सुटकेचा श्वास सोडलाय.'लव्ह सोनिया' सिनेमा नाही, चळवळ आहे - सई ताम्हणकर

Trending Now