महिलांच्या सन्मानासाठी कान फिल्म फेस्टिव्हलच्या पायऱ्यांवर अभिनेत्र्यांनी केलं मूक आंदोलन

कायमच अभिनेत्रींच्या वेशभूषांनी, गाऊन्सनी जो महोत्सव जगभरात चर्चिला जातो तो कान महोत्सव यंदा आणखी एका कारणाने गाजला. आणि ते कारण होत निदर्शनाचं.

Renuka Dhaybar
13 मे : कायमच अभिनेत्रींच्या वेशभूषांनी, गाऊन्सनी जो महोत्सव जगभरात चर्चिला जातो तो कान महोत्सव यंदा आणखी एका कारणाने गाजला. आणि ते कारण होत निदर्शनाचं. ही निदर्शनही कुणी अशा तशा व्यक्तीनी केली नव्हती तर निदर्शन कर्त्या होत्या आताच्या प्रसिद्ध अभिनेत्री.जवळपास 82 अभिनेत्री आणि इतर महिला आर्चिस्टनी कानच्या पायऱ्यांनर आपला निषेध नोंदवला तो महिलांना समान वागणूक मिळावी यासाठी. सलमा हायक आणि जेन फोंडा यांसोबत एकूण 82 जणींना यात भाग घेतला. यात यंदाच्या ज्युरी मेंबरमधल्या पाच सदस्या होत्या.महिला या जगात अल्पसंख्याक नाहीत आम्ही सगळ्याजणी या पायऱ्यांवर यासाठी उभ्या आहोत ते परिवर्तन आणि प्रगतीसाठी असं या निदर्शनांनतर या महिलांनी म्हटलं आहे.

 

Trending Now