छोट्या पडद्यावर श्रेयस तळपदे म्हणतोय 'स्माइल प्लीज'

झी युवावरील 'गुलमोहर' या मालिकेच्या निमित्ताने श्रेयस हा अभिनेत्री गिरीजा ओक - गोडबोले हिच्यासोबत प्रेक्षकांना एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.

Sonali Deshpande
20 जानेवारी : मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध सिनेअभिनेता श्रेयस तळपदे अनेक वर्षांनी छोट्या पडद्यावर येत आहे. झी युवावरील 'गुलमोहर' या मालिकेच्या निमित्ताने श्रेयस हा अभिनेत्री गिरीजा ओक - गोडबोले हिच्यासोबत प्रेक्षकांना एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. गुलमोहर ही छोट्या छोट्या सुंदर हृदयस्पर्शी कथांवर वर आधारित मालिका आहे. ' स्माईल प्लीज ' ही या मालिकेची पहिली कथा असेल.  श्रेयस सतत हसायचं आणि हसवायचं ‘स्माईल प्लीज' म्हणत छोट्या पडद्यावर आगमन करत आहे.गुलमोहर मालिकेत अनेक कथांची गुंफण असते. या कथा तरुणाईच्या असतात. काॅलेजलाईफ, हाॅस्टेल लाईफ, प्रेम, अनेक चढउतार अशा बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतात.श्रेयस तळपदेच्या करियरची सुरुवात मालिकेनंच झाली होती. दामिनी, अवंतिका, बेधुंद मनाच्या लहरी अशा अनेक मालिकांतून त्यानं छाप पाडली. त्यानं रिअॅलिटी शोचं सूत्रसंचालनही केलंय.  छोट्या पडद्यावरूनच त्यानं मोठ्या पडद्यावर झेप घेतली होती. अभिनयाबरोबर त्यानं चांगल्या सिनेमांची निर्मितीही केली होती.

Trending Now