'या' आहेत श्री रेड्डीच्या ५ कॉन्ट्रोव्हर्सी

श्री रेड्डी आणि कॉन्ट्रॉव्हर्सी या एकाच नाण्याच्या दोन बाजू. दोघंही एकमेकांशिवाय फारसं दूर राहू शकत नाही

तेलुगु अभिनेत्री श्री रेड्डीचं नाव तिच्या अभिनयासाठी कमी आणि कॉन्ट्रोव्हर्सीसाठी अधिक घेतलं जातं. बड्या कलाकारांची नावं घेऊन खळबळजनक वक्तव्य करून लाइमलाइटमध्ये कस रहावं हे श्री रेड्डीला चांगलंच कळलं आहे. पुढील पाच कॉन्ट्रोव्हर्सीने फक्त दाक्षिणात्य सिनेसृष्टीतच नाही तर देशभरात रेड्डीचं नाव झालं. कास्टिंग काऊचचा विरोध करत श्री रेड्डीने प्रसारमाध्यमांसमोर भर रस्त्यात कपडे उतरवले होते. तिच्या या कृतीमुळे अगदी काही वेळातच तिचं नाव ट्रेण्ड होऊ लागलं. यानंतर मात्र कॉन्ट्रोव्हर्सी करण्यात तिने मागे कधीच पाहिले नाही. कास्टिंग काऊच हा मुद्दा ऐरणीवर असताना तिने दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अनेक नावाजलेल्या कलाकारांची नावं पुढे करत त्यांनी कास्टिंग काऊच केले असल्याचा गंभीर आरोप केला. यात पवन कल्याण, अभिराम डग्गुबत्ती यांचं नाव होतं.

श्री रेड्डीच्या या कृतीला राम गोपाल वर्माने पाठिंबा देत. ती खरी अभिनेत्री असल्याचं म्हटलं. मुंबईत राहणाऱ्यांना पवन कल्याण कोण हे माहित नसताना ते सध्या श्री रेड्डीबद्दल बोलत आहेत, असं वक्तव्य रामूने केलं.

Trending Now