अभिनेता शशांक केतकरचं प्रियांकाशी शुभमंगल

काही दिवसांपूर्वीच पारंपारिक पद्धतीने शशांक-प्रियांकाचा साखरपुडा झाला होता.आता शशांक-प्रियांकाच्या नव्या आयुष्याच्या इनिंगला सुरुवात झालीये.

Sonali Deshpande
04 डिसेंबर : सध्या सेलिब्रेटींमध्येही लग्नसराईचं वातावरण पाहायला मिळतंय. आता यात आणखी एका सेलिब्रिटी कपलची भर पडलीये. 'होणार सून मी या घरची' मालिकेतील अभिनेता शशांक केतकर आणि प्रियांका ढवळे यांचा लग्नसोहळा नुकताच पार पडला. काही दिवसांपूर्वीच पारंपारिक पद्धतीने शशांक-प्रियांकाचा साखरपुडा झाला होता.आता शशांक-प्रियांकाच्या नव्या आयुष्याच्या इनिंगला सुरुवात झालीये.शशांकचं पहिलं लग्न तेजस्विनी प्रधानशी झालं होतं. 'होणार सून मी या घरची' मालिकेतून दोघांची जोडी लोकप्रिय झाली होती. नंतर दोघांचा घटस्फोट झाला.शशांकचं गोष्ट तशी गमतीची नाटक खूप लोकप्रिय झालं. त्यानं वन वे तिकीट सिनेमातही काम केलेलं.

Trending Now