Love You ‘बापजी’ Miss You : शहारूखने वाहिली अटलजींना श्रध्दांजली

बॉलीवुडचा सुपरस्टार शहारूख खान याने माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींना श्रद्धांजली अर्पण केलीय

मुंबई, ता.16 ऑगस्ट : बॉलीवुडचा सुपरस्टार शहारूख खान याने माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींना श्रद्धांजली अर्पण केलीय. देशाने एक पितृतुल्य व्यक्तिमत्व आणि महान नेता गमावला आहे अशी भावना त्याने व्यक्त केली. शहारूख आपल्या प्रतिक्रियेत म्हणतो, दिल्लीत असताना माझे वडिल मला नेहमी अटलजींच्या सभेला घेऊन जात असत. त्यांच्या भाषणाने आणि वक्तृत्वाने मला प्रभावित केलं होतं. नंतर त्यांना भेटण्याची संधी मिळाली तेव्हा चित्रपट, कला, गाणी,साहित्य यावर त्यांच्याशी खूप चर्चा करता आली. त्यांच्या एका कवितेच्या सादरीकरणादरम्यान अभिनय करण्याची संधीही मला मिळाली. त्यांना घरी सर्वजण ‘बापजी’ या नावाने संबोधित करत. माझ्या वाढत्या वयात त्यांना ऐकण्याची संधी मिळाली हे मी माझं भाग्य समजतो. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. बापजी, तुमचा हसरा चेहरा आता आम्ही कायमचा मीस करू अशी भावनाही शहारूखने व्यक्त केलीय. 

Trending Now