शाहीद कपूरच्या मुलाचं नाव झैन का ठेवलं? आजीनं सांगितलं सत्य

शाहीद कपूर आपल्या बायको आणि नवजात बाळाला घेऊन घरी गेला. बाळाचं स्वागत करायला सगळेच सज्ज झाले. शाहीदच्या मुलाचं नाव झैन ठेवलंय. त्याबद्दल अनेक जण आश्चर्य व्यक्त करतायत. मुलाचं नाव झैन का ठेवलं, याचा सगळे जण विचार करतायत. पण त्याचं कारण आजी नीलिमा अजिजनं सांगितलंय. ज्यावेळी मिशाचा जन्म झाला होता, त्यावेळी दोन नावं फायनल केली होती. मुलगी झाली तर मिशा ठेवणार आणि मुलगा झाला तर झैन. आणि त्यावेळी झाली मुलगी.

म्हणजे नाव आधीच ठरलं होतं. मीरा आणि शाहीद यांचं पहिलं अक्षर घेऊन मिशा ठरलं होतं. जैन हे नाव आजीचा चाॅइस होता. मीराची आई बेला राजपूतही यावेळी नातवाचं कोडकौतुक करायला आल्या होत्या.

Trending Now