PHOTOS : राणादाला मिळणार सखीकडून खास गिफ्ट, वाढदिवसाचं मोठं सरप्राईझ

झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’या मालिकेने लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. राणादा आणि पाठकबाई यांची निरागस,निखळ अशी प्रेमकथा प्रेक्षकांना प्रचंड आवडते. राणादा आणि पाठकबाई यांच्यावर सबंध महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करतात. ऑनस्क्रीन भोळा तसेच रांगडा दिसणारा पेहलवान पठ्ठा राणादा ऑनस्क्रीन अगदी खरा पेहलवान कुस्तीपटू दिसण्यासाठी त्याच्या फिटनेस आणि डाएटकडे खूप लक्ष देतो. सध्या मालिकेत राणा मॅटवरील कुस्तीचा सराव करत आहे आणि त्यासाठी त्याचा पल्ला एका लेडी मॅनेजरशी पडलाय. जिच्यासोबत राणा बोलायला पण लाजत होता त्या सखीसोबत राणाने आता चक्क मैत्री केली आहे. त्यांच्यात झालेल्या दोस्तीच्या कॉन्ट्रॅक्टनुसार राणा आता सखीशी मित्र म्हणून वागत आहे.

सखी राणाला एक घड्याळ भेट म्हणून देणार आहे. सखीकडून भेट वस्तू मिळाल्यावर राणा देखील भारावून जाणार आहे.

Trending Now