करण जोहरच्या 'कभी खुशी कभी गम'वर आता मालिका

'डेली सोप क्वीन' एकता कपूर या सिनेमाचं मालिकेत रूपांतर करणार आहे. 'रोडिज' या रिअॅलिटी शोमधील स्पर्धक वरुण सूद या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे.

Sonali Deshpande
20 एप्रिल : करण जोहर दिग्दर्शित 'कभी खुशी कभी गम' हा सिनेमा प्रचंड गाजला. अमिताभ बच्चन, जया बच्चन, शाहरुख खान, हृतिक, काजोल आणि करिनाची वेगळीच केमिस्ट्री या सिनेमात पाहायला मिळाली. हा सिनेमा थोडा थोडा तुम्हाला रोज पाहायला मिळाला तर? हो, आता याच सिनेमाचं रूपांतर मालिकेत होणारे.'डेली सोप क्वीन' एकता कपूर या सिनेमाचं मालिकेत रूपांतर करणार आहे. 'रोडिज' या रिअॅलिटी शोमधील स्पर्धक वरुण सूद या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची  चर्चा आहे. सिनेमातील हृतिकच्या भूमिकेसाठी वरुणची निवड करण्यात येणारे. आता या मालिकेत बीग बी आणि शाहरुखची भूमिका कोण साकारणार हे पाहणं मोठं रंजक ठरणारे.

Trending Now