गुपित उघडलं, भन्साळीला 'पद्मावत'साठी हवे होते 'हे' दोघं

संजय लीला भन्साळीनं जेव्हापद्मावत सिनेमा करायचं ठरवलं, तेव्हा त्याच्या मनात दुसरीच जोडी होती.

मुंबई, 04 आॅगस्ट : रणवीर सिंग आणि दीपिकाला घेऊन संजय भन्साळी यांनी 'पद्मावत' सिनेमा बनवला. तो सुपरडुपर हिट झाला. वास्तवातली जोडी पडद्यावरही हिट ठरली. भले सिनेमात त्यांची जोडी नव्हती. पण दोघांमधलं टशन चांगलंच जाणवलं. पुन्हा या नावांनाही चांगला युएसपी आहेच. पण तुम्हाला आता एक आतली बातमी सांगू का? संजय लीला भन्साळीनं जेव्हा हा सिनेमा करायचं ठरवलं, तेव्हा त्याच्या मनात दुसरीच जोडी होती.  आणि त्या दोघांना घ्यायचं झालं असतं तर तर मग इतिहासच घडला असता. बाॅक्स आॅफिसवर पद्मावत सिनेमाचाही इतिहास झाला असता.एका मुलाखतीच्या वेळी ऐश्वर्या राय बच्चननं काही गोष्टींचा उलगडा केला. ती म्हणाली, ' संजय लीला भन्साळी माझे आवडते दिग्दर्शक आहेत. त्यांना बाजीराव मस्तानी करताना मला मस्तानीची भूमिका द्यायची होती. पण त्यांना माझ्या योग्य बाजीरावच मिळाला नाही. पद्मावतमध्येही दीपिकाआधी त्यांनी माझा नावाचा उल्लेख केला होता. पण माझ्या योग्य खिलजी त्यांना मिळाला नाही.'मंडळी, तुमच्या लक्षात येतंय का? संजय लीला भन्साळीच्या मनात कोण होतं ते? अर्थातच, सलमान खान. सलमानला घेऊन त्यांना पद्मावत करायचा होता. पण ते काही जमलं नाही. दोघंही आमनेसामने यायला तयार नाहीत. पण खरं तर पद्मावत सिनेमासाठी दोघांना घेणं शक्य होतं. कारण पद्मावती आणि खिलजी सिनेमात कधीच समोरासमोर आले नव्हते. मग रसिक प्रेक्षकांना सलमान आणि ऐश्वर्या एका सिनेमात असण्याचा आनंद मिळाला असता, तो मुकला.

ऐश्वर्यानं भन्साळींच्या गुजारिश, हम दिल चुके है सनम, देवदास या सिनेमांत काम केलंय. दिग्दर्शकाबरोबर तिचं चांगलं जमतंही. आता सलमान आणि ऐश्वर्याला एका सिनेमात आणण्याचं आव्हान दिग्दर्शक पेलणार का, ते पाहायचं.

Trending Now