VIDEO : गोविंदाच्या तालावर नाचतायत संदीप कुलकर्णी,हृषिकेश जोशी

आता संदीप कुलकर्णी आणि हृषिकेश जोशीही गोविंदा आला रे आला म्हणत नाचण्यासाठी सज्ज झालेत.

मुंबई, 3 सप्टेंबर : गोविंदा आला रे आला असं नुसतं ऐकलं तरीही पावलं ठेका धरायला लागतात. कुठेही तुम्ही असलात तरीही नाचण्यासाठी लगेच अंगात उर्मी येते. आता संदीप कुलकर्णी आणि हृषिकेश जोशीही गोविंदा आला रे आला म्हणत नाचण्यासाठी सज्ज झालेत.गोविंदा आला रे आला हे नवं गाणं लाँच केलंय. आणि त्या गाण्यात संदीप, हृषिकेश जोशी आणि अमोल पराशर यांनी खूप धमाल केलीय. सुरुवातीला चेहऱ्यावर वेगवेगळे भाव आणि त्यानंतर नाचाचा ठेका धरत सगळ्यांनीच एंजाॅय केल्याचं दिसून येतंय.

अभिनेता, लेखक हृषीकेश जोशी 'होम स्वीट होम' मधून दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहे, या चित्रपटात दिवंगत अभिनेत्री रिमा तसेच मोहन जोशी, हृषिकेश जोशी, स्पृहा जोशी, प्रसाद ओक, विभावरी देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 'होम स्वीट होम' ची कथा हृषिकेश जोशी, वैभव जोशी, मुग्धा गोडबोले यांची आहे. संगीतकार नरेंद्र भिडे, संतोष मुळेकर यांनी कवी,गीतकार वैभव जोशी यांच्या गीतांना स्वरबद्ध केले आहे.नात्यातला गोडवा आपल्याला या सिनेमात पाहता येईल. 'होम स्वीट होम' येत्या २८ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. रिमा लागूंचा हा शेवटचा सिनेमा ठरलाय.VIDEO: मै हूँ डॉन...शिवेंद्रराजेंचा ठेका !

Trending Now