शाहरुखच्या रील लाइफ लेकीने शेअर केले हॉट PHOTOS

बऱ्याच वर्षांनंतर छोट्या पडद्यावराल रीयालीटी शो कॉमेडी सर्कस हा पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये अनेक प्रसिद्ध कॉमेडीयन्स असणार आहेत. या सगळ्यांमध्ये एक नवा चेहरा आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे. बॉलिवूडचा स्टार किंग खान शाहरुखची कन्या सना सईद आता छोट्या पडद्यावर तुम्हाला कॉमेडी करताना दिसणार आहे. कॉमेडी करणं अतिशय अवघड काम आहे. याची कल्पना असतानाही सना आपल्या सगळ्यांना हसवण्याचा प्रयत्न करणार आहे. आता ते तिला कितपत जमणार हे येणारा काळच सांगेल.

सना सईदचा हा शो तब्बल 5 वर्षांनंतर पडद्यावर झळकणार आहे. हा शो प्रदर्शीत होण्याआधी तिने सोशल मीडियावर काही बोल्ड फोटोज शेअर केले आहेत. या फोटोमधला तिचा अंदाज अगदी ग्लॅमरस दिसत आहे. सध्य़ा ती सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते. सना सईदने शाहरुख खानच्या 'कुछ कुछ होता है' या सिनेमात चाईल्ड अॅक्टर म्हणून काम केलय, आणि 2012मध्ये स्टुडंट ऑफ दि ईयरमध्ये देखील तिने सपोर्टींग अॅक्टरचं काम केलं आहे.

Trending Now