VIDEO : 'वक्रतुंड महाकाय'ला अवधूत गुप्तेचा स्वरसाज

सागरिका म्युझिकने 'वक्रतुंड महाकाय' या खास गाण्याचा व्हिडिओ गणेशोत्सवानिमित्त सोशल मीडियावर नुकताच लाँच केला आहे.

मुंबई, 7 सप्टेंबर : 'वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ' गणेशोत्सव अगदी उंबरठ्यावर आहे आणि सागरिकाने महाराष्ट्राच्या या लाडक्या गणरायाचं स्वागत याच शब्दात केलं आहे.सागरिका म्युझिकने 'वक्रतुंड महाकाय' या खास गाण्याचा व्हिडिओ गणेशोत्सवानिमित्त सोशल मीडियावर नुकताच लाँच केला आहे. या व्हिडिओचं दिग्दर्शन सागरिका दास यांनी केलं आहे.मराठी संगीत क्षेत्रातील दोन आघाडीच्या आणि रसिक प्रेक्षकांच्या लाडक्या अवधूत गुप्ते आणि आदर्श शिंदे या दोघांच्या दमदार आवाजात हे गीत संगीतबद्ध करण्यात आले आहे. या व्हिडिओमध्ये काहे दिया परदेस फेम ऋषी सक्सेना आणि घाडगे आणि सून मधील रिचा अग्निहोत्री आणि नवोदित कलाकार निरंजन जोशी यांनी आपली उत्तम अदाकारी दाखवली आहे

लगबग चालली, सारखं गोड अविट चालीचं सुपरहिट गीत देणाऱ्या सुहित अभ्यंकरने हे गीत संगीतबद्ध केलं आहे. पारंपरिक ढोल, ताशा,  तुतारी या वाद्यांसोबत गिटार चा सुंदर मिलाफ या गाण्यात आहे. नचिकेत जोग यांनी गाण्याचे साधेसोपे, अर्थपूर्ण आणि आजच्या परिस्थितीला साजेशे असे शब्द लिहिले आहेत.गणेशोत्सवाची तयारी तर जोरात सुरू आहे. याच काळात गणेश गीताचे अनेकविध अल्बम लाँच होत असतात. ऋषी सक्सेना काहे दिया परदेसमुळे लोकप्रिय झाला होता. हिंदी भाषिक ऋषीनं मराठी मालिका नंबर वन टीआरपीला ठेवली होती. याही अल्बममध्ये ऋषीची अदाकारी आणि रिचाचं नृत्य यांचा सुरेख मेळ घातला गेलाय.

PHOTO : LGBT सेलेब्रिटींच्या यादीत आणखी कोण कोण?

Trending Now