83ची तयारी : रणवीर कुणाकुणाकडून क्रिकेटचे धडे घेतोय बघा

बॉलिवूडचा मॅचो मॅन रणवीर सिंगचा ‘सिंबा’ चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण करून त्याने आता त्याच्या आगामी बहुचर्चित चित्रपट '83'ची तयारी सुरू केलीय. १९८३मध्ये भारतीय संघाने पहिला क्रिकेट विश्वचषक जिंकाला होता त्याची कथा या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. यामध्ये रणवीर सिंगने कपिल देवची भूमिका साकारली आहे.

कपिल देवची भूमिका साकारणारा रणवीर सिंग अर्थातच पहिल्यांदा कपिल देवना भेटला. रणवीरचा कपिल कसा असेल हे 83 रीलिज झाल्यावर समजेलच. सुरुवातीला त्याने क्रिकेटचा गॉड मानला जाणाऱ्या सचिनसोबतचे काही फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले होते. कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनीच्या आयुष्यावर आधारित सिनेमासाठी सुशांतसिंग राजपूतने यापूर्वी क्रिकेटपटूंचा असाच अभ्यास केला होता.  आता या १९८३च्या फोटोत कपिल ऐवजी रणवीरला इमॅजिन करा बरं... कसं वाटतंय? 

Trending Now