#News18RisingIndia : रणबीरनं नाकारलेला सिनेमा रणवीरला मिळाला आणि....

तो म्हणाला, हे सर्व स्वप्नवत आहे. तिथपासून ते आजपर्यंत मला वाटतंय की मी एखादं स्वप्नच जगतोय.

Sonali Deshpande
19 मार्च : रणवीर सिंग म्हणजे प्रचंड उत्साह, उर्जा आणि याचाच अनुभव आला जेव्हा न्यूज18 रायझिंग इंडियाच्या व्यासपीठावर रणवीर सिंग आला. त्याची एंट्रीच मोठी धमाकेदार झाली. पद्मावतच्या गाण्यावर थिरकत रणवीरनं एन्ट्री केली तेव्हा सगळ्यांनीच त्याचं जोरदार स्वागत केलं.बँड बाजा बारात सिनेमातून सुरुवात करणाऱ्या या अभिनेत्यानं सांगितलं की याआधी आपण बरेच सिनेमे नाकारले होते. बँड बाजा बारातसाठी पहिली पसंती होती रणबीर कपूरची. पण त्यानं सिनेमाला नकार दिल्यानं आॅडिशन्स सुरू झाल्या. रणवीरनंही आॅडिशन दिली. रणवीर म्हणाला, त्याला तोच सिनेमा करायचा होता. आणि त्याची निवड झाली.पहिलाच सिनेमा यशराजचा मिळणं म्हणजे एक स्वप्न पूर्ण होण्यासारखं होतं. पण त्यावेळी रणवीरला आदित्य चोप्रानं सांगितलं होतं, तू फार चांगला दिसत नाहीस, म्हणून तुला अभिनय चांगला करावा लागणारेय. सिनेमा रिलीज झाल्या झाल्याच रणवीर लोकप्रिय झाला. तो म्हणाला, हे सर्व स्वप्नवत आहे. तिथपासून ते आजपर्यंत मला वाटतंय की मी एखादं स्वप्नच जगतोय.

Trending Now